Uddhav Thackeray “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बदनामी करण्यासाठी…” उध्दव ठाकरे 

0

मुंबई,दि.९: Uddhav Thackeray’s Big Statement On Devendra Fadnavis शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा उल्लेख करत मोठे वक्तव्य केले आहे. शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी आमदार निवासातील कँटिनमध्ये कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आमदार संजय गायकवाड यांना देण्यात आलेल्या डाळीचा दुर्गंध येत असल्याने त्यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली असल्याचा दावा करण्यात येत आहे. 

आमदार गायकवाड यांनी थेट बनियन टॉवेलवरच कॅन्टीन गाठलं आणि कॅन्टिन चालकाला बेदम मारहाण केली. सुरुवातीला  जोरदार कानशिलात लगावली त्यानंतर त्यांनी कॅन्टीन चालकाला ढकलंल, तो खाली पडला. गायकवाड यांनी त्यांच्या रूममध्ये जेवण मागवले होते. 

Uddhav Thackeray’s Big Statement On Devendra Fadnavis

मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे पडसाद पावसाळी अधिवेशनातही उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना लोकप्रतिनिधीने मारहाण करणे चुकीचे असल्याचे म्हटलं. या घटनेवर उध्दव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. 

काय म्हणाले उध्दव ठाकरे? | Uddhav Thackeray’s Big Statement On Devendra Fadnavis

ठाकरे यांनी संजय गायकवाड हे प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बदनामीसाठी काढले गेले असावे असा, वक्तव्य करत संशय व्यक्त केला आहे. सरकारमध्ये काहीतरी चालले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. तसंच ते म्हणाले की, गायकवाडांवर कारवाई करण्याचे आदेश सीएम यांनी दिलं असल्याच माझ्या कानावर आलं आहे. पण ही कारवाई होते की नाही ते काही दिवसांमध्ये कळेलच. 

संजय गायकवाड सारखा आमदार शिवसेनेचा असूनच शकत नाही. तो एसंशि गटाचा आमदार आहे असं सांगत ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला होता. त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाले नाही. त्यामुळे ते वाटच पाहत आहेत, असा संशय उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here