नांदेड,दि.9: शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी लोहा इथे एकनाथ पवार यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मला प्रश्न विचारायचा आहे की 100 वर्ष तुमच्या संघटनेला झाली. एवढ्यासाठी हा पक्ष तुम्ही वाढवलात. बरं हे राजकारण ठेवा बाजूला, यांना निवडणुकीच्या तोंडावर कळालं की शेतकरी आहेत आणि त्यांना कर्जमुक्ती करू. इथे माता भगिनी नावाचाही प्रकार आहे, त्यांना आपण बहीण मानुया, असे ठाकरे म्हणाले.
दीड हजार रुपये देऊया. इथे सभेला माता भगिनी आल्या आहेत. त्यांना मी जाहीर प्रश्न विचारतोय की पंधराशे रुपयांत तुमचं घर चालतं का मला सांगा. आज तुम्हाला पंधराशे रुपये महत्त्वाचे आहेत की तुमच्या शीलाचे रक्षण करणे जास्त महत्त्वाचे आहे. महिला सुरक्षा महत्त्वाची की 1500 रुपये महत्त्वाचे? आपलं सरकार आल्यानंतर महिलांना तीन हजार रुपये देणार आहोत.
जनतेचे न्यायालय तारीख पे तारीख देत नाही, एकदाचा सोक्षमोक्ष लावून जातात असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला तसेच मी मुख्यमंत्री असताना मोदी शहांची महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंम्मत नव्हती असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही…
इथले खासदार सांगत होते की लातूर आणि नांदेडमध्ये शिवसैनिकांनी खुप मेहनत केली. आज मला वसंतरावांची खुप आठवण येत आहे, कारण वसंतराव आणि माझी फार भेट नाही झाली. हिंगोलीत आल्यावर त्यांनी मला विचारलं की हिंगोलीत सभा मिळेल का? म्हटलं सभा देणं कठीण आहे, आपण हवं तर पत्रकार परिषद घेऊ. म्हणाले काही हरकत नाही. नांदेडची जागा 100 टक्के जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांचा विश्वास खरा ठरला आणि नांदेडची जागा जिंकलो. दुर्दैव असं की ते आपल्यातून ते गेले. पण त्यांचा वारसदार आपल्याला निवडून द्यायचा आहे. हाच तो आघाडी धर्म. जसं आम्ही लातूर आणि नांदेडमध्ये काँग्रेससाठी काम केलं तसं आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही जिथे जिथे मशाल आहे तिथे आमचे उमेदवार निवडून द्या आम्ही तुमचे उमेदवार निवडून आणू, असेही ठाकरे म्हणाले.