मालेगाव,दि.26: Uddhav Thackeray Malegaon: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मालेगाव येथे सभेत शिंदे गटावर जोरदार टीका केली. गद्दारांच्या हातामध्ये भगवा शोभत नाही.. पक्ष चोरला.. चिन्ह चोरले पण यांना शिवसैनिक चोरता आला नाही…. पण गद्दारांचा शिक्का कपाळावर मारुन घेतला, असे ठाकरे म्हणाले.
‘सत्ता गेल्याचं दु:ख नाही. सत्ता गेल्यानंतर चांगलं काम करणारं सरकार गद्दारी करुन तुम्ही पाडलंत आणि निर्लज्जासारखा छत्रपतींचा भगवा हातात गद्दार नाचत आहात. गद्दार हा शिक्का आयुष्यभर पुसला जाणार नाही. जिकडे तुम्ही जाल तिकडे गद्दार म्हणूनच ओळखले जाल, अशी तोफ उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर डागली.
नरेंद्र मोदी यांच्यावर टीका | Uddhav Thackeray Malegaon
तुमचा नेता म्हणजे भारत नव्हे, मोदी म्हणजे भारत नव्हे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. मोदी म्हणजे भारत, तुम्हाला मान्य आहे का? यांच्यासाठी स्वातंत्र्याविरांनी बदिलान दिले होते का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. यावेळी बोलताना उद्दव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना सावरकरांच्या मुद्द्यावरु खडसावले..आपण एकत्र असलो तरी सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा राहुल गांधींना दिला.
शिवसेनेने तुम्हाला जन्म दिला.. तुम्ही आईच्या कशीवर वार केला, असाही टोला शिंदे आणि 40 बंडखोर आमदारांना उद्धव ठाकरेंनी लगावला. हिंमत असेल तर आज निवडणूक लावा.. तुम्ही मोदींच्या नावाने लढा, मी बाळासाहेबांच्या नावाने लढतो, असा टोला ठाकरे यांनी शिंदेंना आणि भाजपला लगावला.
खेडमध्ये अतिविराट सभा झाली होती… आजची सभा आणखी अथांग पसरली आहे. संजय राऊत आपण म्हणालात ते बरोबर आहे, आज आपलं नाव, धनुष्यबाण चोरला आहे.. माझ्या हातात काहीही नाही.. तरिही इतकी गर्दी.. ही सर्व पूर्वजांची पुण्याई आहे. मी पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी लढत नाही. तुमच्या कष्टासाठी लढतोय.. आता जिंकेपर्यंत लढायचेय. गद्दार आणि ढेकणाला चिरडायला तोफेची गरज नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
जगभरात कोरोनाचा संकट आले तेव्हा… मुंबईतील धारावी आणि मालेगावमध्ये कोरोनाने थैमान घातले होते. तेव्हा काळजाचा ठोका चुकला होता. त्यावेळी तुम्ही सर्वांनी सहकार्य केले नसते, तर मालेगाव वाचले नसते.. तुम्ही माझे ऐकले तुमचे धन्यवाद, असेही ठाकरे म्हणाले.
नाव चोरले, धनुष्यबाण चोरलं… पण ही जीवाभावाची माणसे, प्रेम करणारी माणसे चोरू शकत नाहीत. प्रेम करणारी माणसे विकत घेता येत नाहीत. मुख्यमंत्रीपद येते आणि जाते… पण हे प्रेम कायम राहते.. हे प्रेम गद्दारांच्या नशीबात नसते. कांद्याला भाव मिळाला नाही, असे तुम्ही म्हणतात. मी म्हणतो कांदा खरेदी झाली. एक कांदा 50 खोक्याला विकला गेला, असा टोला उद्धव ठाकरेंनी शिंदेंना लगावला.
अस्मानी सुलतानी अशी दोन्ही संकटे आपल्या सरकारवेळी होती. पण आपल्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता. सत्ता आल्यावर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करायचे हा निश्चय केला होता. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी पहिले पाऊल उचलले होते. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन म्हणून देणार होतो. पण गद्दारी झाली अन् सरकार गेले. जे विकेल ते पिकेल… ही योजना आणणार होतो… शेतकऱ्यांना मार्गदर्शन हवेय… पुढील वर्षी काय पिकवावे.. याचे मार्गदर्शन करण्याची गरज आहे. शेतकर्यांना फक्त हमीभाव नव्हे तर हमखास भाव मिळाला पाहिजे… हा माझा उद्देश होता, असे ठाकरे म्हणाले.