Turkey Bird Viral Video: संकटाची चाहूल पशू-पक्षांना आधीच लागते? आनंद महिंद्रा यांनी शेअर केला Video

Turkey Bird Viral Video: तुर्की आणि सीरियात भूकंपामुळे सुमारे 4000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे

0

मुंबई,दि.7: Turkey Bird Viral Video: संकटाची चाहूल पशू-पक्षांना आधीच लागते असे म्हटले जाते. तुर्की आणि सीरियामध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीने जगाचं लक्ष वेधलं आहे. तुर्की आणि सीरियात भूकंपामुळे सुमारे 4000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या भूकंपाआधीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पक्षी आकाशात घिरट्या घालत विचित्र आवाज काढताना ऐकायला आणि पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

संकटाची चाहूल पशू-पक्षांना आधीच लागते? | Bird Viral Video

एखादं संकट येण्यापूर्वी पक्षी किंवा प्राण्यांना त्याची चाहूल लागते, असं म्हटलं जातं. अनेक वेळी तुम्ही ऐकलं असेल की, कुत्र्यांनी काही संकटाची चाहूल लागली की ते रडतात. काही वाईट घडणार आहे याचा अंदाज आल्याने काही पशू आणि पक्षी विचित्र आवाज किंवा हालचाल करून आपलं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात, असं काही लोक मानतात. त्यामुळे तुर्कीमधील हा व्हिडीओ पाहिल्यानंतरही लोक आता हेच म्हणत आहेत. सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे की, भूकंपाची चाहूल लागल्यामुळे तुर्कीमध्ये पक्षी विचित्र आवाज काढत आकाशात घिरट्या घालत होते.

आनंद महिंद्रांनी व्हिडीओ केला ट्विट | Turkey Bird Viral Video

सोशल मीडियावर सक्रिय असलेले उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही हा व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये याला Nature’s Alarm म्हटलं आहे. महिंद्रा यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, ‘निसर्गाची अलार्म सिस्टम. जे ऐकण्यासाठी आपण अद्याप निसर्गाशी पूर्णपणे जोडले गेलो नाही.’

भूकंपाआधी तुर्कीमध्ये पक्षांचा विचित्र आवाज | Viral Video

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, काही पक्षी आवाज घिरट्या घालत विचित्र प्रकारचा आवाज काढत आहे. हा आवाज अतिशय कर्कश आणि मोठा आहे. या परिसरातील लोकांनी पक्षांचे हे कधी न पाहिलेलं वागणं आणि हालचाली विचित्र असल्याचे जाणवले आणि काहींनी ही घटना कॅमेऱ्यामध्ये चित्रित केली. त्यानंतर सोमवारी तुर्की आणि सीरियामध्ये भूकंप झाला. त्यामुळे आता पक्षांच्या या विचित्र वागण्याचा संदर्भ भूकंपाच्या घटनेसोबत जोडला जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here