Truck Bus Accident: ट्रक आणि एसटी बसचा भीषण अपघात, 25 प्रवासी जखमी

0

छत्रपती संभाजीनगर,दि.20: Truck Bus Accident: ट्रक आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे. मालवाहू ट्रक आणि एसटी बसचा अपघात झाला. या अपघातामध्ये 25 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. अपघात घडल्यानंतर ट्रकचालक ट्रक घटनास्थळीच सोडून पसार झाला आहे. हा अपघात आडूळ परिसरात सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडला. जखमींना स्थानिकांच्या मदतीनं छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली होती. सुमारे अर्धा किलोमीटर लांब वाहनाच्या रांगा लागल्याचं पहायला मिळालं. (Accident News)

ट्रकने बसला मागून दिली धडक | Truck Bus Accident

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, धुळे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर छत्रपती संभाजीनगरकडून एक मालवाहतूक करणारा ट्रक जात होता. या ट्रकला आडळू परिसरात बसने ओव्हरटेक केले. मात्र त्यानंतर या ट्रकने बसला मागून धडक दिली. मागून जोरदार धडक बसल्यानं चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस दुभाजकाला धडकली. अपघात होताच ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला.

25 प्रवासी जखमी | Accident News

अपघातामध्ये बसमधील तब्बल 25 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पाचोड पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठी वाहतूककोंडी निर्माण झाली होती. पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यात आली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here