Home सोशल मीडिया व्हायरल Tomato Bouncer Video: टोमॅटोच्या सुरक्षेसाठी दोन बाऊन्सर तैनात, माजी मुख्यमंत्र्याने व्हिडिओ केला...

Tomato Bouncer Video: टोमॅटोच्या सुरक्षेसाठी दोन बाऊन्सर तैनात, माजी मुख्यमंत्र्याने व्हिडिओ केला शेअर

0

वाराणसी,दि.10: Tomato Bouncer Video: टोमॅटोच्या (Tomato) सुरक्षेसाठी दोन बाऊन्सर (Bouncer) तैनात करण्यात आलेला व्हिडिओ माजी मुख्यमंत्र्याने शेअर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर गगनाला भिडलेले पाहायला मिळत आहे. जिथे कमी दरात टोमॅटो मिळतील तिथे जाऊन खरेदी केली जात आहे. तसंच ते साठवून ठेवले जात आहे. अशातच वाराणसीमधील एका व्हिडीओची जोरदार चर्चा रंगली आहे. हा व्हिडीओ समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी शेअर केला आहे. संबंधित व्हिडीओची चर्चा होण्याचं कारण म्हणजे, एका भाजी विक्रेत्याने टोमॅटोच्या साठ्याच्या पहाऱ्यासाठी चक्क दोन बाऊन्सर तैनात केले आहेत.

Tomato Bouncer Video | टोमॅटोच्या सुरक्षेसाठी दोन बाऊन्सर तैनात

वाराणसीच्या लंका भागातील हा व्हिडीओ आहे. इथल्या एका भाजी विक्रेत्याने टोमॅटोचा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी दोन बाऊन्सर तैनात केले आहेत. अजय फौजी असं या विक्रेत्याचं नाव असून तो समाजवादी पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्याने टोमॅटोचा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी बाऊन्सर तैनात करण्याच्या त्याच्या कल्पनेची जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान अजय फौजी यांनी मागील आठवड्यात सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या वाढदिवसानिमित्त टोमॅटोच्या आकाराचा केक कापला आणि लोकांना टोमॅटो वाटले होते.

या अनोख्या निर्णयाबद्दल अजय फौजी म्हणाले की, “बाऊन्सर तैनात केले आहेत, कारण टोमॅटोची दरवाढ तुम्ही पाहतच आहात. टोमॅटोसाठी मारामारी आणि लूटमार होत आहे. अशा घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत. आम्ही टोमॅटो मागवले आहेत. इथे मारामारी होऊ नये म्हणून आम्ही बाऊन्सर तैनात केले आहेत.” ते पुढे म्हणाले की, “टोमॅटोच्या वाढत्या किमतीमुळे टोमॅटो खरेदी करताना लोकांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याच्या चर्चा माझ्या कानावर आल्या होत्या. आमच्या दुकानात आलेल्या लोकांनीही तसाच प्रयत्न केला. त्यामुळे मी ठरवलं आता बास झालं, त्यानंतर मी माझ्या दुकानात बाऊन्सर तैनात करण्याचा निर्णय घेतला.”

बाऊन्सर सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ड्युटीवर असतात

फौजी म्हणाले की या महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी त्यांच्या दुकानात साध्या कपड्यांमध्ये बाउन्सर तैनात केले होते, परंतु जेव्हा टोमॅटो खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी दरांवरुन बाचाबाची करण्याचा प्रयत्न केला तेव्हा गणवेशधारी बाऊन्सर तैनात केले. अजय फौजी सध्या 140 ते 160 रुपये किलो दराने टोमॅटोची विक्री करत आहेत. ते म्हणाले की, दुकानात तैनात असलेले दोन्ही बाऊन्सर सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ड्युटीवर असतात. मात्र, त्यांना किती पगार दिला याची माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. ‘कोणतीही एजन्सी मोफत बाऊन्सर देणार नाही,’ असं त्यांनी म्हटलं.

“जोपर्यंत माझ्याकडे टोमॅटोचा साठा आहे तोपर्यंत मी माझ्या दुकानात बाऊन्सर तैनात ठेवेन,” असं त्यांनी सांगितलं. बाऊन्सर तैनात केल्यानंतर ग्राहक दुकानात येतात का असं विचारलं असता फौजी म्हणाले की, ‘ग्राहक दुकानात येतात, किंमत विचारतात. ते बाऊन्सर्सकडे पैसे देतात आणि त्यांच्याकडून माल घेतात. काही जण तर कुतूहलाने बाऊन्सर्सना पाहण्यासाठी दुकानातही येतात, कारण भाजीच्या दुकानात बाऊन्सर तैनात करणं ही त्यांच्यासाठी नवीन गोष्ट आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.