खुनी हल्ल्याप्रकरण माजी सैनिकासह तिघांना अटकपूर्व जामीन मंजूर

0

सोलापूर,दि.११: खुनी हल्ल्याप्रकरणी न्यायालयाने माजी सैनिकासह तिघांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. यात हकीकत अशी की फिर्यादी घनश्याम रा. सोलापूर हे मौजे होटगी येथील त्यांच्या शेतामध्ये दि.19/4/25 हजर असताना संशयित आरोपी बनसिद्ध गेनु बिराजदार, बेळणी पंडित बिराजदार व सिद्धाप्पा बाबू शिंगाडे यांच्यासह इतर दोघांनी जमिनीच्या वादातून सदर फिर्यादी वरती सतुर, काठी, लोखंडी रॉड याच्या साह्याने प्राणघातक हल्ला केल्याची फिर्याद वळसंग पोलीस स्टेशन येथे देण्यात आली. 

अटकेच्या भीतीपोटी सदरील संशयित आरोपीनी जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. सदर जामिनाच्या युक्तीवादावेळी आरोपीच्या वकिल्याने असा युक्तिवाद केला की सदर आरोपीस झालेल्या जखमा या जुन्या जखमा असून सदरील फिर्यादीस जमिनीच्या न्यायालयीन वादामध्ये अपयश आल्यामुळे चिडून जाऊन सदरची खोटी फिर्याद दिलेली आहे. 

तसेच सदरील संशयित आरोपीकडून काही जप्त करावयाचे नाही व सदर फिर्याद देण्यास तब्बल 50 तासाचा उशीर झालेला असून तो उशीर कशामुळे झाला याचा कुठल्याही प्रकारचा खुलासा सदर फिर्याद देणाऱ्यांनी त्याच्या फिर्यादीमध्ये केलेला नाही.

सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील सत्र न्यायाधीश यांनी सदरील संशयित आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केला. यात संशयित आरोपीतर्फे ॲड, अभिजीत इटकर, ॲड, फैयाज शेख,अॅड सुमित लवटे,अॅड शिवाजी कांबळे यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here