मुंबई,दि.7: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हरियाणातील सत्ताधारी भाजपा सरकारला मोठा झटका बसला आहे. तीन अपक्ष आमदारांनी मंगळवारी राज्यातील नायबसिंग सैनी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा काढून घेतल्याचे जाहीर केले. तीन आमदार सोंबीर सांगवान, रणधीर गोलेन आणि धरमपाल गोंदर यांनी निवडणुकीदरम्यान काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा आणि प्रदेश काँग्रेसचे प्रमुख उदय भान यांच्या उपस्थितीत रोहतक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत तिन्ही आमदारांनी ही घोषणा केली. अपक्ष आमदार गौंडर म्हणाले, “आम्ही सरकारचा पाठिंबा काढून घेत आहोत. आम्ही आमचा काँग्रेसला पाठिंबा देत आहोत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह विविध प्रश्नांवर आम्ही हा निर्णय घेतला आहे.”
पत्रकार परिषदेत बोलताना प्रदेश काँग्रेसचे प्रमुख उदय भान म्हणाले, “तीन अपक्ष आमदार – सोंबीर सांगवान, रणधीर सिंग गोलेन आणि धरमपाल गोंदर यांनी भाजपा सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे आणि काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. भान मला हेही सांगायचे आहे की. (90 सदस्यीय) हरियाणा विधानसभेचे सध्याचे संख्याबळ 88 आहे, त्यापैकी भाजपचे 40 सदस्य आहेत, याआधी भाजप सरकारला जेजेपी आमदार आणि अपक्ष आमदारांचा पाठिंबा होता, परंतु जेजेपीनेही पाठिंबा काढून घेतला होता आणि आता अपक्ष आमदारांनीही समर्थन मागे घेतले आहे.”
उदय भान म्हणाले, “नायबसिंग सैनी सरकार आता अल्पमतातील सरकार आहे. सैनी यांना एक मिनिटही राहण्याचा अधिकार नसल्याने त्यांनी राजीनामा द्यावा. आता विधानसभा निवडणुका तातडीने व्हाव्यात.”