सोलापूर: शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा मृत्यू, उत्तर सोलापूर तालुक्यातील घटना

0

सोलापूर,दि.२१: उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी गावातील शेततळ्यात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. Three drowned in a field pond, Incidents in North Solapur taluka

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, कैलास गुंड याच्या शेततळ्यात तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. यात सारिका अक्षय ढेकळे (वय २२), गौरी अक्षय ढेकळे (वय ५) व आरोही अक्षय ढेकळे (वय २) असे मृत मुलींचे नावे आहेत. 

पाथरी गावचे उपसरपंच श्रीमंत बंडगर यांनी माहिती दिली की, मयत सारिका यांच्या नणंदेचे हे शेत आहे. अक्षय ढेकळे यांचेही शेत शेजारीच आहे त्यांची द्राक्षाची बाग आहे. दरम्यान दुपारी चारच्या सुमारास शेततळ्यात यांचा मृतदेह आढळून आला, यामध्ये सारिका ढेकळे यांनी त्यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुली गौरी आणि आरोही यांचा समावेश होता.

घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दाखल झाले त्यांनी त्वरित हे तिन्ही मृतदेह बाहेर काढून त्याचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयाकडे मृतदेह पाठवून देण्यात आले आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव हे घटनास्थळी दाखल होत आहेत या घटनेने पाथरी गावावर शोककळा पसरली असून एका महिन्याभरात अशी दुसरी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे यापूर्वी उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी गावामध्ये शेततळ्यामध्ये तीन मुलींचा बुडून मृत्यू झाला होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here