या नेत्याने राजू श्रीवास्तव यांच्याविरोधात फेसबुकवर केली आक्षेपार्ह पोस्ट, गुन्हा दाखल

0

उत्तर प्रदेश,दि.22: बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष दानिश अली यांनी राजू श्रीवास्तव यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली. या नेत्याने केलेल्या वक्तव्याची पोलिसांना माहिती मिळताच पोलिस ॲक्शन मोडमध्ये आले. एसपींनी संबंधित पोलिस ठाण्याला कारवाई करण्याचे निर्देश दिले. पोलिसांनी आरोपी नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात बहुजन मुक्ती पार्टीचे (BMP) प्रदेशाध्यक्ष दानिश अली यांनी कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली. नेत्याने पोस्ट करताच लोकांनी नेत्यावर टीका केली. या प्रकरणाची माहिती मिळताच एसपी हेमराज मीना यांनी पिपरी पोलिसांना कारवाईच्या सूचना दिल्या. पोलिसांनी आरोपी नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी बुधवारी सकाळी दीर्घ आजाराशी झुंज देत जीवनाची लढाई हारली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच देशभरातील त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली. त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला.

दरम्यान, बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यवाह प्रदेशाध्यक्ष दानिश अली यांनी फेसबुकवर आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. त्यांची पोस्ट पाहताच लोक संतापले. त्यांच्या या वक्तव्यावर लोकांनी संताप व्यक्त केला.

कोणीतरी स्क्रिनशॉट घेऊन कौशांबी पोलिसांना ट्विटरवर टॅग केले. हा प्रकार पाहताच एसपी हेमराज मीना यांनी कारवाईच्या सूचना पोलिसांना दिल्या.

दानिश अली हे पिपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहेत. एसपींच्या सूचनेनुसार, पिपरी एसओने आयटी ॲक्ट आणि धार्मिक भावना भडकावण्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक समर म्हणाले, “दानिश अली यांनी दिवंगत राजू श्रीवास्तव यांच्यावर अशोभनीय टिप्पणी केली होती. आरोपींविरुद्ध पिपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे, आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here