या लोकांना मिळणार कोरोना लसीचा बूस्टर डोस, कोरोना लसीच्या बूस्टर डोसला मिळाली परवानगी

0

दि.23 : लसीकरणाची मोहीम देशात सुरू आहे. जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. अनेकांचे लसीचे दोन्ही डोस झाले आहेत. अशातच बूस्टर डोसची गरज असल्याची चर्चा सुरू होती.

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर काही कालावधी नंतर इम्युनिटी कमी होत जाते. अशात तिसरा डोस म्हणजे बुस्टर डोस देण्याची चर्चा होत होती, आता याचा मार्ग मोकळा झाला आहे.

फायझर कोरोना बुस्टर डोसला मंजुरी देण्यात आली आहे. अमेरिकेच्या एफडीकडून आपात्कालीन वापराला परवानगी मिळाली आहे.

कंपनीने 16 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना बुस्टर डोस देण्याची परवानगी एफडीएकडे मागितली होती. पण तज्ज्ञांच्या समितीने ही मागणी नाकारली.

काही विशिष्ट नागरिकांनाच बुस्टर डोस देण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. एफडीएच्या निर्देशनानुसार जे गंभीर आजारी आहेत आणि वयस्कर आहेत त्यांना बुस्टर डोस दिला जाईल. कारण तरुणांसाठी हा डोस घातक ठरू शकतो.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here