हे आहेत भारतातील टॉप 10 श्रीमंत भारतीय,पहिल्या क्रमांकावर मुकेश अंबानी

0

दि.7:भारतातील सर्वात श्रीमंत 100 व्यक्तींची Forbesने यादी जाहीर केली आहे. फोर्ब्सने भारतातील 100 श्रीमंतांची यादी जाहीर करत 775 डॉलर्सची नोंद केली आहे. मागील 12 महिन्यात यात 50 टक्क्यांची वाढ झाली आहे. वाढत्या शेअर बाजाराने 2021 च्या सदस्यांच्या एकत्रित संपत्तीला चालना दिली.

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आहेत. 2008 पासून त्यांनी आपला हा पहिला नंबर कायम ठेवला आहे. मागील 14 वर्षांपासून ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्याची संपत्ती 92.7 अब्ज डॉलर्स इतकी आहे.

मुकेश अंबानी यांच्यानंतर गौतम अदानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सलग तिसऱ्या वर्षी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती 25.2 अब्ज डॉलर्सवरुन 74.8 अब्ज डॉलर्स अशी जवळपास तीन पटीने वाढली आहे. त्यांच्या कंपन्यांचे शेअर्स वाढल्याने त्यांना हा फायदा झाला.

सॉफ्टवेअर कंपनी HCL टेक्नोलॉजीचे संस्थापक शिव नाडर तिसऱ्या क्रमांकावर आहेत, ज्यांनी देशातील उत्तम तंत्रज्ञान क्षेत्रातून 10.6 अब्ज डॉलर्सची संपत्ती वाढवली आणि आता 31 अब्ज डॉलर्ससह ते भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

त्यानंतर राधाकिशन दमानी हे सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती 15.5 अब्ज डॉलर्सवरुन 29.4 अब्ज डॉलर्स अशी जवळपास दुप्पट झाली आहे.

हे आहेत टॉप 10 श्रीमंत भारतीय –

1.मुकेश अंबानी – US$92.7 billion

2.गौतम अदानी – $74.8 billion

3.शिव नाडर – $31 billion

4.राधाकिशन दमानी – $29.4 billion

5.सायरस पुनावाला – $19 billion

6.लक्ष्मी मित्तल – $18.8 billion

7.सावित्री जिंदाल – $18 billion

8.उदय कोटक – $16.5 billion

9.पालोनजी मिस्त्री – $16.4 billion

10.कुमार बिर्ला – $15.8 billion


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here