नवी दिल्ली,दि.8: अनेकांना कोबी मंचुरियन खायला आवडते. बाहेरील पदार्थ स्वच्छ प्रकारे तयार केले जातात असे अनेकांना वाटते. मंचुरियन बऱ्याच लोकांना आवडतं. जे लोक फास्ट फूड खात असतात त्यांना मंचुरियन खायलाही भरपूर आवडतं. बहुतेक लोकांना असं वाटतं की मंचुरियन अगदी स्वच्छ प्रक्रियेद्वारे तयार केलं जात असेल. म्हणूनच ते कुठेही मंचुरियन खातात. पण तुम्ही खात असलेलं कोबी मंचुरियन किती अस्वच्छ असू शकतं, हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही जर खरंच कोबी मंचुरियन प्रेमी असाल तर हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कोबी मंचुरियन बनवण्याची प्रक्रिया दाखवली आहे. हा व्हिडिओच पाहूनच कोणालाही किळस येईल. तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यास कदाचित ते खाणंच बंद कराल. मंचुरियनचा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही कोबी मंचुरियन कसं तयार केलं जात आहे ते पाहू शकता. सर्वत्र चटई पसरवून लोक कोबीचे छोटे तुकडे करताना दिसतात. त्यांच्या हातात हातमोजेही नाहीत. कोबीचे तुकडे केल्यानंतर, ते एका टोपलीमध्ये ठेवले जातात, ज्यामध्ये घाण साचलेली असते. यानंतर एक व्यक्ती या कोबीवरुनच चालत जातो.
यानंतर ते एका मोठ्या भांड्यात ओतलं जातं. मग विविध प्रकारचे मसाले, मीठ आणि पीठ त्यात टाकतात. हे सर्व झाल्यानंतर एक कर्मचारी हाताने ते सगळं मिसळतो. मिसळल्यानंतर, पेस्ट दुसऱ्या भांड्यात ओतली जाते. नंतर त्याचे छोटे गोळे करून तळले जातात. तुम्ही बघू शकता की, गोबी मंचुरियन बनवण्याच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान, कोणत्याही व्यक्तीने हातमोजे वापरले नाहीत किंवा डोकं हेडकॅपने झाकलं नाही. आता असं अस्वच्छ मंचुरियन खाल्ल्यानंतर तुमच्या आरोग्यासाठी ते किती वाईट असेल याची कल्पना करा. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की बहुतेक फास्ट फूड बनवण्याची प्रक्रिया सारखीच असते आणि ते तळून किंवा भाजल्यानंतरच आपल्याला दिले जातात.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून अनेक युजर्स अवाक झाले आहेत. एका युजरने म्हटलं की, ‘मी जेवढे जास्त असे व्हिडिओ पाहतो, तितकी मला बाहेरचं खाणं टाळण्यास मदत होते.’ तर दुसर्या यूजरने सांगितलं की, ‘स्वच्छता फक्त घरच्या जेवणातच मिळते.’ दुसरा वापरकर्ता म्हणाला, ‘साबण संपला आहे. चला आज कोबी मंचुरियनने आंघोळ करूया’.