लखनऊ,दि.24: यूपी विधानसभा (UP Assembly Election) निवडणुकीच्या या मोसमात कोणत्याही पक्षाला प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवण्याची एकही संधी सोडायची नाही. असेच काहीसे शनिवारी देशातील सर्वात उंच व्यक्तीने समाजवादी पक्षात प्रवेश केल्यावर पाहायला मिळाले. यावेळी स्वतः माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) हे धर्मेंद्र प्रताप सिंह (Dharmendra Pratap Singh) यांच्यासोबत दिसले. एका निवेदनात समाजवादी पक्षाने म्हटले आहे की, पक्षाच्या धोरणांवर आणि अखिलेश यादव यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत आज प्रतापगढचे धर्मेंद्र प्रताप सिंह यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. उत्तर प्रदेशचे अध्यक्ष नरेश उत्तम पटेल यांनी धर्मेंद्र प्रताप सिंग यांना पक्षात सामावून घेताना त्यांच्या येण्याने समाजवादी पक्ष मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला. धर्मेंद्र प्रताप सिंग हे 46 वर्षांचे असून भारतातील सर्वात उंच उंची 8 फूट 2 इंच आहे. प्रतापगडचे सौरभ सिंह हेही उपस्थित होते.
धर्मेंद्र प्रताप यांची उंची 2.4 मीटर म्हणजेच 8 फूट 1 इंच आहे आणि ते जगातील सर्वात उंच व्यक्तीपेक्षा केवळ 11 सेमी लहान आहेत. धर्मेंद्र प्रताप हे उत्तर प्रदेशातील मेरठचे रहिवासी आहेत. इतकी लांबी त्यांच्यासाठी अडचण निर्माण करते आहे. धर्मेंद्र प्रताप यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, यामुळे त्यांना नोकरी किंवा जीवनसाथी शोधण्यातही अडचणी येत आहेत.
या कारणास्तव त्यांनी मनोरंजन पार्कमध्ये कलाकार म्हणून काम केले आहे. त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी लोक 10 रुपयेही देतात. त्यांना चालण्यासही त्रास होत असून अनेकवेळा ते अपघाताला बळी पडले आहेत. धर्मेंद्र प्रताप सिंग यांच्या कुटुंबात त्यांचे आजोबा वगळता फारसे उंच लोक नसले तरी त्यांच्या आजोबांची उंची 7 फूट 3 इंच आहे.
धर्मेंद प्रताप सिंह यांच्याकडे मास्टर डिग्री आहे. परंतु 46 वर्ष असतानाही अद्याप त्यांच्याकडे कायमस्वरुपी नोकरी नाही. धर्मेद्र यांचे लग्नही झालं नाही. धर्मेंद्र यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी सांगितले की, उंची जास्त असल्याने कमरेखालच्या भागात सातत्याने वेदना होत असतात. रोजचा दिनक्रम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
आता उत्तर प्रदेश निवडणुकीत ते समाजवादी पक्षाचा प्रचार करणार आहेत. पक्ष मला जी जबाबदारी देईल ती सांभाळायला मी तयार आहे. जर सपानं मला तिकीट दिले तर प्रतापगड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे, असे धर्मेंद्र प्रताप सिंह यांनी म्हटले आहे.