पुराच्या पाण्यात प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस गेली वाहून

0

दि.२८ : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे राज्यामध्ये पावसाची तीव्रता वाढली आहे. मराठवाडा, बीड, नागपूरमध्ये सोमवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत असताना एसटी चालकाने पुराच्या पाण्यातून बस नेण्याचा प्रकार यवतमाळमध्ये घडला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील (Yavatmal district) उमरखेड (Umerkhed) शहरापासून काही अंतरावर ही दुर्घटना घडली असल्याची माहिती समोर येत आहे. उमरखेड पुसद रस्त्यावर दहेगाव नाल्यावरुन पाणी असताना नागपूर डेपोची एसटी बस चालकाने नाल्यावरुन टाकल्याने गाडी नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली आहे. बसमधे चार ते सहा प्रवासी होते असे समजते.

View this post on Instagram

A post shared by SolapurVarta (@solapur_varta)

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास ही घटना घडली असून एसटी दहागांव नाला पार करत असताना हा प्रकार घडला आहे. उमरखेड तहसीलदार ठाणेदार सध्या घटनास्थळी आहेत व स्थानिक नागरिक व तालुका टीमच्या सहाय्याने लोकांना वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

एसटी बस नाल्यात वाहून गेल्यानंतर एसटीतील दोन प्रवासी झाडावर चढलेले आहेत व दोन लोक एसटी बसच्या टपावर आहेत. कंडक्टरनं झाडावर असून त्याने सोबत ५ते ६ प्रवासी असल्याचे ओरडुन सांगितले. त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. बस नागपूर डेपोची होती नांदेड वरून नागपूरला निघाली होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here