Devmanus Season 2 : लोकप्रिय देवमाणूस मालिकेचा दुसरा सिजन या तारखेपासून होणार सुरू

0

Devmanus Season 2 : झी मराठी वरील लोकप्रिय ठरलेली देवमाणूस (Devmanus) मालिकेचा दुसरा सिजन (Devmanus Season 2) 20 डिसेंबर पासून सुरू होणार आहे

सोलापूर,दि.7: झी मराठी (Zee Marathi) वरील लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ (Devmanus) मधील डॉ. अजित कुमार देव हा अनेकांची हत्त्या करतो असे या मालिकेत दाखवण्यात आले होते. देवमाणूस मालिकेचा दुसरा सिजन (देवमाणूस 2) (Devmanus Season 2) येणार आहे. ‘देवमाणूस’ ही मालिका लोकप्रिय ठरली होती. ही मालिका सत्य घटनेपासून प्रेरणा घेऊन बनविण्यात आल्याचे बोलले जाते. मालिकेतील डॉ. अजित कुमार देव अनेकांना फसवून त्यांची हत्या करतो. गावातील लोकं मात्र त्याला देवमाणूस समजतात असे मालिकेत दाखवण्यात आले होते.(Devmanus Season 2)

देवमाणूस (Devmanus) मालिकेने 15 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता मालिकेचा दुसरा सिजन (Devmanus Season 2) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. देवमाणूस 2 (Devmanus 2) या मालिकेचे चित्रीकरण नुकतेच सुरू झाल्याचे श्वेता शिंदेने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. त्यामुळे ती परत आलीये ह्या मालिकेच्या जागी आता देवमाणूस ही नवी मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. डॉक्टरची भूमिका अभिनेता किरण गायकवाड याने साकारली होती. (Devmanus Season 2)

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

प्रेक्षकांमध्ये देवमाणूसच्या (Devmanus) दुसऱ्या सीजनची (Devmanus Season 2) उत्सुकता असून मालिकेचे अनेक प्रोमो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहेत. मालिकेचा नवीन प्रोमो पाहून सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.

देवमाणूस (Devmanus) मालिकेच्या शुभारंभ निमित्त 19 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता एक तासाचा विशेष भाग दाखवण्यात येणार आहे. देवमाणूस मालिका (Devmanus Season 2) 20 डिसेंबर पासून सोमवार ते शनिवार रात्री 10.30 सुरू होणार आहे. झी मराठी (Zee Marathi) ने यासंदर्भात प्रोमो रिलीज केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here