अमोल मिटकरींनी ट्विट केलेल्या व्हिडिओवर सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले स्पष्टीकरण

0

मुंबई,दि.२५: आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) ट्विट केलेला तो व्हिडिओ आमदार निवासातला नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) व्हिडिओ (Video) ट्विट करत आमदार निवासातील असल्याचा दावा करत आरोप केला होता. यात एक वेटर आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी चक्क शौचालयातलं पाणी वापरत असल्याचा आरोप मिटकरी यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे. हजारो कोटींचे टेंडर कंत्राटदाराला दिल्यानंतर आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी कंत्रादारांकडून विशेष टॉयलेटची व्यवस्था केल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे. आता सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्टीकरण देत हा व्हिडिओ आमदार निवासातला नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा Amol Mitkari: अमोल मिटकरींचा आमदार निवासातील व्हिडिओ ट्विट करत आरोप

सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले स्पष्टीकरण

आझादी का अमृत महोत्सव हा हॅशटॅग वापरून अमोल मिटकरींनी एक व्हिडिओ ट्विट केला होता. या व्हिडिओत आमदार निवासतल्या कपबशा धुण्यासाठी टॉयलेटमधल्या पाण्याचा वापर केला गेल्याचा आरोप अमोल मिटकरींनी केला होता. “हे नागपूर हिवाळी अधिवेशनातील आमदार निवासस्थानातील उपहारगृह. हजारो कोटींचं टेंडर कंत्राटदाराला दिल्यानंतर आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी कंत्राटदारांकडून विशेष टॉयलेटची व्यवस्था” अशा खोचक ओळीही मिटकरी यांनी लिहिल्या होत्या. मात्र आता सार्वजनिक बांधकाम विभागाने अमोल मिटकरी यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ आमदार निवासातील नाही असं स्पष्टीकरण दिलं आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग
अमोल मिटकरी

व्हिडीओ क्लिपची जोरदार चर्चा

आमदार मिटकरींनी बुधवारी रात्री ट्विट केलेल्या एका २० सेकंदांच्या व्हिडीओ क्लिपची जोरदार चर्चा नागपूर विधिमंडळ परिसरा उत्तत चालू आहे. या व्हिडीओमध्ये आमदार निवासातील उपहारगृहात कपबशा स्वच्छतागृहात धुतल्या जात असल्याचा दावा अमोल मिटकरींनी केला होता.

जाहिरात

अजित पवारांनी विधानसभेत उपस्थित केला प्रश्न

हा मुद्दा दुसऱ्या दिवशी अजित पवारांनी विधानसभेत उपस्थित करत सरकारला जाब विचारला. “अधिवेशनासाठी महाराष्ट्रभरातून नागपूरला सगळे सदस्य येतात. त्यांच्या निवासाची व्यवस्था विधिमंडळाला करावी लागते. सरकार कुणाचंही असलं, तरी २८८ आमदार, विधानपरिषदेचे सर्व आमदार, स्टाफ यांची व्यवस्थित सोय करणं हे विधिमंडळाचं काम आहे. असं असतानाही इतक्या चुकीच्या गोष्टी चाललेल्या आहेत. टीव्हीला ही व्हिडीओ क्लिप सारखी दाखवत आहेत”, असं अजित पवार म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here