सोलापूर जिल्हा ग्रामीण कोरोना रुग्ण संख्येत होत आहे वाढ

0

सोलापूर,दि.12 : सोलापूर जिल्ह्यात कोरोना (Covid-19) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मध्यंतरी कमी होत असलेली रुग्ण संख्या पुन्हा वाढत आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 142 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 175766 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 171627 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 462 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 3677 झाली आहे. यात 2389 पुरुष व 1288 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 1259 अहवाल प्राप्त झाले. यात 1117 निगेटिव्ह तर 142 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 78 पुरुष आणि 64 महिलांचा समावेश आहे. आज एकही जणांची नोंद मृत म्हणून नाही. तर 29 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here