निवडणुका असणाऱ्या राज्यात वाढू शकते Omicronच्या रुग्णांची संख्या, केंद्र सरकारचे राज्यांना हे निर्देश

0

Omicron Guideline From Central Government: भारतात ओमिक्रॉन व्हेरीयंटच्या (Omicron Variant) रुग्णांची संख्या वाढत आहे. ओमिक्रॉन व्हेरीयंटच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हायलेव्हल मिटिंग झाली आहे. तत्पूर्वी केंद्र सरकारने ओमिक्रॉनवरून राज्य सरकारांनी केलेल्या तयारीचा आढावा घेतला आहे.

निवडणूक असणाऱ्या राज्यांमध्ये ओमिक्रॉन प्रकाराच्या संसर्गाचा प्रसार वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारने लसीकरणाला गती देण्यास सांगितले आहे. केंद्राने गुरुवारी राज्यांसोबत आढावा बैठक घेतली आणि आगामी काळात निवडणूक राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली. केंद्राने म्हटले आहे की, ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत त्या राज्यांमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉनची प्रकरणे वाढू शकतात, त्यादृष्टीने लसीकरणाला गती देण्यात यावी. विशेषत: ज्या जिल्ह्यांमध्ये लसीकरण कमी झाले आहे.

यासोबतच केंद्राने राज्यांना सणासुदीच्या आधी स्थानिक निर्बंध लावण्याचा विचार करण्यास सांगितले आहे. राज्यांमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर केंद्राने गुरुवारी राज्य सरकारांना सणासुदीच्या आधी स्थानिक निर्बंध लावण्याचा विचार करण्यास सांगितले. केंद्राने राज्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला होता आणि जिल्ह्यांतील केसेसची पॉझीटिव्ह, दुप्पट दर आणि नवीन प्रकरणांच्या क्लस्टरवर लक्ष ठेवण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत.

केंद्र सरकारने केल्या या सूचना

1 – नाईट कर्फ्यू लावा, गर्दीच्या कार्यक्रमांना-ठिकाणांवर निर्बंध लादावेत, खासकरून उत्सव लक्षात घेऊन. कोरोनाचे रुग्ण वाढले तर कंटेनमेंट झोन, बफर झोन तयार करा. 

2 – टेस्टिंग आणि संपर्कात आलेल्यांवर लक्ष ठेवण्यावर विशेष लक्ष द्यावे. आयसीएमआरने आणि आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या गाईडलाईननुसार दारा दारात जाऊन रुग्णांचा शोध घेणे आणि आरटीपीसीआर टेस्टची संख्या वाढवावी. 

3 – हॉस्पिटलमध्ये बेड, अँम्युलन्स आणि आरोग्य उपकरणे वाढविण्यावर भर द्यावा. ऑक्सिजनचा बफर स्टक बनवा. तसेच 30 दिवसांच्या औधांचा साठा करावा.

4 – लोकांना सतत माहिती दिली जावी. अफवा पसरू नयेत याची काळजी घ्यावी, यासाठी राज्यांनी दररोज माहिती द्यावी. 

5 – राज्यांनी 100 टक्के लसीकरणावर लक्ष केंद्रीत करावे. सर्व पात्र लोकांना दोन डोस मिळालेत का हे तपासण्यासाठी दारोदारी जाऊन अभियान राबवावे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here