Cryptocurrency: मोदी सरकार बिटकॉइनसह सर्व क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालू शकते

0

या अधिवेशनातच येईल विधेयक

सोलापूर,दि.24: मोदी सरकार (Modi Government) बिटकॉइनसह (Bitcoin) सर्व क्रिप्टोकरन्सीवर (cryptocurrency) बंदी घालू शकते. सरकार क्रिप्टोकरन्सीवर (cryptocurrency) कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहे. सर्व खाजगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घातली जाईल. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session of Parliament) सरकार यासाठी विधेयक (Bill) आणणार आहे.

सरकार क्रिप्टो करन्सीबाबत कडक धोरण राबविण्याच्या स्थितीत असल्याचे दिसते. सरकार क्रिप्टोकरन्सीवर कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहे. सर्व खाजगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घातली जाईल. यासाठी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात ‘द क्रिप्टोकरन्सी अँड रेग्युलेशन ऑफ ऑफिशियल डिजिटल करन्सी बिल 2021’आणणार आहे. (The Cryptocurrency & Regulation of Official Digital Currency Bill, 2021) 

क्रिप्टोकरन्सी तंत्रज्ञानाच्या वापराबाबतही सरकार काही शिथिलता देऊ शकते. या विधेयकात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या वतीने सरकारी डिजिटल चलन चालवण्यासाठी फ्रेमवर्कची तरतूद असेल. या विधेयकाची माहिती सरकारने लोकसभेच्या बुलेटिनमध्ये दिली आहे.

अर्थविषयक संसदीय समितीमध्ये क्रिप्टोकरन्सीबद्दल चर्चा झाली, ज्यामध्ये बंदी घालण्याऐवजी नियम सुचवण्यात आले. यासोबतच सरकार संसदेत कृषीविषयक कायदे मागे घेण्यासाठी विधेयक मांडणार आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात एकूण 29 विधेयके आणली जाणार आहेत. त्यापैकी 26 बिले नवीन असतील.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here