आयकर विभागाने शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्या संस्थेवर केली कारवाई

0

मुंबई,दि.7: आयकर विभागाने शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांच्या संस्थेवर कारवाई केली आहे. भावना गवळी यांच्या संस्थेचे खाते आयकर विभागाने गोठवले आहे. भावना गवळी यांनी शिवसेनेत बंड झाल्यानंतर एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला होता. भावना गवळी या वाशिम यवतमाळच्या खासदार आहेत. महाराष्ट्रात भाजपा, शिंदे गट व अजित पवार गट सत्तेत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील खासदाराच्या संस्थेवर आयकर विभागाने कारवाई केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर अनेक आमदार व खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. यातील बहुतांश आमदार व खासदारांवर ईडीची कारवाई सुरू होती. 29 डिसेंबर रोजी भावना गवळी यांना आयकर विभागाने नोटीस दिली होती. 5 तारखेला त्या संदर्भातील म्हणणे त्यांना मांडायचं होते. मात्र त्या प्रत्यक्ष उपस्थित राहिल्या नाहीत. गवळी यांनी प्रतिनिधी पाठवून नोटीसला उत्तर दिले. होते. मात्र त्यावर इन्कम टॅक्स विभागाचे समाधान झाले नाही. 8.26 कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स भरण्यासाठी अखेर भावना गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेची खाती गोठवण्यात आली आहेत.

भावना गवळी यांनी महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेत 24 कोटी रुपयांचा अफरातफर आणि त्यातून सात कोटी रुपये चोरी गेले अशी तक्रार 12 मे 2020 रोजी रिसोड पोलीस स्टेशनला दिली होती. मात्र या संदर्भातील इन्कम टॅक्स भरला नसल्याची बाब समोर आल्यानंतर त्यांना आयकर विभागाने ही नोटीस जारी केली होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here