हॉटेलमालकाने सदाभाऊ खोत यांना रस्त्यात अडवलं आणि मागितले बिलाचे पैसे

0

सोलापूर,दि.१६: रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना हॉटेलमालकाने रस्त्यावर अडवलं आणि बिलाचे पैसे मागितले. निवडणुकीत अमाप पैसे खर्च केले जातात. प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना जेवण दिले जाते, अनेक प्रकारे खर्च केला जातो. माजी मंत्री सदाभाऊ यांनी २०१४ मध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत इतरांप्रमाणे सदाभाऊंनीही कार्यकर्त्यांना खुश ठेवले. परंतु आता तेच अंगलट आले आहे.

एका हाॅटेल मालकाने सदाभाऊ खोत यांनी हाॅटेलमध्ये पार्टी करून त्याचे पैसे न दिले नसल्याच्या कारणावरून हा ताफा अडवला. हाॅटेल मालकाने खोत यांच्या गाड्यांच्या ताफ्यासमोर गोंधळ घातला. खोत यांच्या आज पंचायत राज समितीच्या दौऱ्यादरम्यान हा प्रकार समोर आला आहे.

पंचायत राज्य समिती दौऱ्यानिमित्त रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत सांगोला दौऱ्यावर आले होते. नेहमीप्रमाणे कार्यकर्त्यांचा गराडा होता. परंतु सदाभाऊ खोत कारमधून खाली उतरताच मांजरी येथील अशोक शिनगारे यांनी त्यांच्या समोर येऊन उभे राहिले आणि त्यांना जाब विचारू लागले. २०१४ साली लोकसभा निवडणुकीमध्ये सांगोला तालुक्यातील मांजरी येथे एका हाॅटेलमध्ये राहिलेले ६६ हजार ४५० रुपये बिलाचे देण्याचे राहिले असल्यामुळे हाॅटेल मालकाने ताफा अडवला. दरम्यान, आपल्याला बदनाम करण्याचा राष्ट्रवादीचा डाव असल्याचा सदाभाऊ यांनी आरोप केला आहे. तर आपले पैसे द्या अशी हॉटेल मामा भाचाचे मालक अशोक शिनगारे यांनी आपली भूमिका यावेळी मांडली. वारंवार फोन करूनही सदाभाऊ पैसै देत नसल्याचा आरोप या हाॅटेल मालकाने केला आहे.

राष्ट्रवादीकडून बदनाम करण्याचा प्रयत्न

दरम्यान, हाॅटेल मालकाने केलेल्या आरोपांबाबत खोत यांनी प्रतिक्रिया देत आरोपांचं खंडन केलं आहे. ‘मी त्या मालकाला ओळखत नाही. हा माणूस राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. ते काळे झेंडे आणि निदर्शन करणार होते पण माझा ताफा लवकर आला आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. मी २०१४ पासून १५ वेळा सांगोल्यात आलो आहे. मी त्या माणसाला ओळखत नाही. राष्ट्रवादीकडून बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्टीकरण सदाभाऊ खोत यांनी यावेळी दिलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here