Free Smartphone Tablet: कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात येत होते. ऑनलाईन शिक्षणासाठी स्मार्टफोन लागतो. (Free Smartphone Tablet) ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन आहेत त्यांना काही अडचण आली नाही मात्र जे विद्यार्थी गरीब आहेत ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही अशा विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येतात. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आताच्या काळात स्मार्टफोन व टॅबलेट खूप गरजेचे आहे. शिक्षणासाठी स्मार्टफोन व टॅबलेट विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे आहे. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. (Free Smartphone Tablet)
उत्तर प्रदेशात लवकरच विधान सभेच्या निवडणुका होणार आहेत. सर्वपक्षीयांनी निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरण्याची तयारी सुरू केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) तरुणांना टेक्नोलॉजीने अपग्रेड करण्यासाठी मोठी भेट दिली आहे. यूपी सरकारने घोषणा केली आहे की, तरुणांना स्मार्टफोन आणि टॅबलेट फ्री (Free Smartphone Tablet) मध्ये वाटणार आहे. विद्यार्थी यूपीत फ्री स्मार्टफोन, टॅबलेट योजना वितरणाची तारीख येण्याची वाट पाहत आहेत. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निशुल्क स्मार्टफोन आणि टॅबलेटचे (Free Smartphone Tablet) वितरण सुरू केले जाणार आहे.
सर्व माहिती पोर्टलवर मिळणार
यासाठी डीजी शक्ति नावाने पोर्टल बनवले गेले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून स्मार्टफोन आणि टॅबलेटचे वितरण आणि विद्यार्थ्यांना भविष्यात शिक्षणासाठी कंटेट दिला जाणार आहे. याशिवाय, स्मार्टफोन आणि टॅबलेट संबंधी वेळोवेळी त्यांचा मोबाइल नंबर आणि मेल आयडी वर सूचना दिली जाणार आहे.
स्मार्टफोन आणि टॅबलेट फ्री
सरकारकडून विद्यार्थ्यांना फ्री स्मार्टफोन आणि टॅबलेट देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यांना रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. रजिस्ट्रेशन पासून स्मार्टफोन आणि टॅबलेट वितरणा पर्यंत संपूर्ण व्यवस्था एकदम फ्री आहे. विद्यार्थ्यांचा डेटा कॉलेजकडून तसेच विद्यापीठाकडून घेतला जाणार आहे.
५ लाख स्मार्टफोन वाटले जाणार
पहिल्या फेजमध्ये यूपीत २.५ लाख टॅबलेट आणि ५ लाख स्मार्टफोन वाटले जाणार आहेत. करोना काळात ऑनलाइन क्लासेस होत आहेत. त्यामुळे गॅझेट्सची विद्यार्थ्यांना खूपच गरज आहे. त्यामुळे हे लॅपटॉप वाटले जाणार आहेत.