सोलापूर लोकसभा मतदानाची अंतिम आकडेवारी आली समोर; झाले इतके मतदान

0

सोलापूर,दि.8: सोलापूर लोकसभा मतदार संघात मंगळवारी (दि.7) मतदान झाले. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपाचे आमदार राम सातपुते यांच्यात अटीतटीची लढत झाली आहे. सोलापूर लोकसभा मतदार संघातील मतदानाची अंतिम आकडेवारी जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जाहीर केली आहे.

सोलापूर लोकसभा मतदार संघात 59.19 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे. सोलापूर लोकसभा मतदार संघात एकुण 2030119 मतदार आहेत. यात पुरूष मतदारांची संख्या 1041470 आहे, तर महिला मतदारांची संख्या 988450 आहे.

सोलापूर लोकसभा मतदार संघात 1201586 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात 645015 पुरूषांनी तर 556515 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. पुरूषांची टक्केवारी 61.93 तर महिलांची 56.30 टक्के आहे.

मोहोळ विधानसभा मतदार संघात सर्वाधिक 63.15 टक्के मतदान झाले आहे. मोहोळ विधानसभा मतदार संघात एकुण 319808 मतदार आहेत. यापैकी 201965 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सोलापूर शहर मध्य मतदार संघात सर्वात कमी 56.51 टक्के मतदान झाले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here