नवी दिल्ली,दि.6: निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्ष म्हणून केले घोषीत केले आहे. अजित पवार यांनी बंड करत राष्ट्रवादी पक्षावर दावा केला होता. अजित पवारांनी बंड केल्यामुळे राष्ट्रवादी पक्षात फूट पडली होती. अजित पवार गट राज्यात भाजपा व शिंदे गटाबरोबर सत्तेत आहे.
शरद पवार यांना निवडणूक आयोगाकडून मोठा धक्का बसला आहे. कारण, निवडणूक आयोगाने अजित यांच्या गटालाच खरी राष्ट्रवादी घोषित केली आहे. सर्व पुरावे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. अजित पवार गटाला राष्ट्रवादीचे नाव आणि निवडणूक चिन्ह वापरण्याचा अधिकार असल्याचे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे.
शरद पवार यांना निवडणूक आयोगाने नवीन पक्ष स्थापनेसाठी तीन नावे देण्यास सांगितले आहे. बुधवारी दुपारी 4 वाजेपर्यंत ही नावे द्यावी लागणार आहेत.
6 महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या 10 हून अधिक सुनावणींनंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद मिटवला असून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. आपल्या निर्णयामध्ये, आयोगाने याचिकेच्या देखभालक्षमतेच्या विहित चाचण्यांचे पालन केले, ज्यामध्ये पक्षाची उद्दिष्टे आणि उद्दिष्टे यांची चाचणी, पक्षाच्या घटनेची चाचणी आणि संघटनात्मक आणि विधान बहुमताची चाचणी यांचा समावेश होता.
अनेक वकिलांनी अजित पवार गटाची बाजू मांडली. यामध्ये मुकुल रोहतगी, नीरज कौल, अभिकल्प प्रताप सिंग (ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड) तसेच श्रीरंग वर्मा, देवांशी सिंग, आदित्य कृष्णा, यामिनी सिंग यांचा समावेश आहे.
असे ठरवला जातो पक्षाचा बॅास
पक्षाचा खरा ‘बॉस’ कोण असेल? त्याचा निर्णय प्रामुख्याने तीन गोष्टींवर आधारित असतो. पहिला- कोणत्या गटाचे जास्त प्रतिनिधी निवडून आले आहेत? दुसरा – कोणाकडे जास्त पदाधिकारी आहेत आणि तिसरे – कोणाच्या बाजूला मालमत्ता आहेत. पण कोणत्या गटाला पक्ष मानले जाईल? त्याचा निर्णय बहुसंख्य निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या आधारे घेतला जातो. उदाहरणार्थ, ज्या गटात जास्त खासदार आणि आमदार आहेत तो पक्ष समजला जातो. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत याच आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.
अजित पवार यांनी शरद पवारांचा विरोध झुगारून महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले. महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे 41 आमदार अजित पवारांसोबत गेले तर उर्वरित आमदारांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. दोन्ही गटांनी पक्षावर दावा सांगितल्याने अखेर हे प्रकरण निवडणूक आयोगासमोर गेले. आयोगासमोर तब्बल 10 वेळा झालेल्या सुनावणीनंतर आज निवडणूक आयोगाने अजित पवारांचा गट हाच मूळ राष्ट्रवादी पक्ष असल्याचं सांगत पक्षाचं चिन्हही त्यांना दिलं आहे.