असदोद्दीन ओवेसी यांच्या वाहनावर कारवाई करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला पोलीस आयुक्तांनी दिले बक्षीस

0

सोलापूर,दि.24: AIMIM चे खासदार असदोद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या उपस्थितीत सोलापुरात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काल (दि.23) एमआयएमचा (MIM) मेळावा झाला. मेळाव्यासाठी ओवेसी असदोद्दीन हे हैदराबादहून (Hyderabad) सोलापुरात आले त्यावेळी त्यांच्या गाडीला समोरील बाजूस नंबरप्लेट नव्हती.

ओवेसी आलेल्या लॅन्डरोव्हर, वाहन क्रमांक टीएस-11 / ईव्ही-9922 या वाहनांवर पुढील बाजूस नंबरप्लेट नव्हती. त्यामुळे, सदर चारचाकी वाहनावर केंद्रीय मोटार वाहन कायदयानुसार सीएमव्हीआर कलम 50/177 अन्वये कारवाई करण्यात आली. पोलिसांनी त्यांना 200 रुपयांचा दंड ठोठावला होता.

सात रस्ता परिसरातील शासकीय विश्रामगृह परिसरात एमआयएमचा सोलापुरात मेळावा होत असल्याने वाहतूक व शहर पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. सकाळी दहाच्या सुमारास असुदोद्दीन ओवेसी शासकीय विश्रामगृहात दाखल झाले. त्यांचे वाहन शासकीय विश्रागृहात दाखल झाल्यानंतर त्यांच्या गाडीला समोरील बाजूस नंबरप्लेट नव्हती, परंतु मागील बाजूला नंबरप्लेट लावलेली होती. वाहतूक पोलिस शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश चिंताकिंदी यांनी केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार त्यांच्या गाडीचा फोटो काढून घेतला. कारवाई करताना खासदार ओवेसी यांचे चालक त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी दोनशे रुपये दंड रोखीने भरला.

ओवेसी ज्या गाडीतून प्रवास केला त्या गाडीला नंबर प्लेट नसल्याने वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित गाडी चालकावर कारवाई करत 200 रुपयांचा दंड ठोठावला. पोलीस निरिक्षक वाबळे यांचे समवेत सपोनि रमेश चिंतांकिदी आणि हवालदार सिरसाट यांनी निपक्षपातीपणे ही कामगिरी केली. त्यांच्या या चांगल्या कामगिरीबद्दल सोलापूर शहर पोलीस आयुक्तांनी चिंताकिंदी यांना रोख 5 हजार रुपयांचे बक्षीस मंजूर करुन गौरव केला. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here