केंद्र सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत, पेट्रोल, LPG Cylinder बाबत घेणार निर्णय

0

नवी दिल्ली, दि.12: पेट्रोल, LPG Cylinder बाबत केंद्र सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय (MoPNG) आणि वित्त मंत्रालय पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्यासाठी चर्चा करत आहेत, सूत्रांनी बिझनेस टुडे टीव्हीला या संदर्भात सांगितले. वित्त मंत्रालयाने गेल्या वर्षी लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितले की सरकारला पेट्रोलवर उत्पादन शुल्क म्हणून 27.90 रुपये आणि डिझेलवर 21.80 रुपये प्रति लीटर मिळतात.

10 एप्रिलला सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर राहिल्या. गेल्या 19 दिवसांत ही सहावी वेळ आहे जेव्हा इंधनाच्या किमतींमध्ये कोणताही बदल झाला नाही. 22 मार्चपासून इंधनाच्या दरात प्रतिलिटर 10 रुपयांनी वाढ झाली आहे.

एलपीजी स‍िलिंडर पुन्हा महागणार!

एलपीजी सिलिंडरच्या (LPG Cylinder) किमतीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कसल्याही प्रकारची वाढ होऊ नये, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र, कमर्शियल गॅस सिलिंडर महाग होऊ शकते. सध्या दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 949.50 रुपये एवढी आहे.

पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क

सरकारला उत्पादन शुल्काच्या माध्यमातून पेट्रोलवर प्रति लीटर 27.90 रुपये तर डिझेलवर प्रति लीटर 21.80 रुपये मिळतात, असे अर्थमंत्रालयाने 2021 मध्ये लोकसभेत सांगितले होते. केंद्र सरकारने नोव्हेंबर 2021 मध्ये पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करत अनुक्रमे 5 रुपये आणि 10 रुपये कमी केले होते. आता सरकारने यात परत कपात केल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा एकदा कमी होऊ शकतात.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here