सोशल मीडियावर (Social Media) लग्नाचे अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होतात. सोशल मीडियावर लग्नाचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. नवऱ्याची वरात निघालेली अनेकांनी पाहिले आहे. पण नवरीची घोडीवरून वरात निघालेली क्वचितच पाहिले असेल. असाच एक बिहारमधील लग्नाचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये नवरदेव नाही तर चक्क नवरी घोडीवरून वराच्या घरी पोहोचली आणि त्यानंतर जबरदस्त डान्स करून तिने लोकांची मने जिंकली.
लग्नात काहीतरी वेगळं करायची अनेकांना आवड असते. आपल्या विशिष्ट प्रकारची चर्चा व्हावी असे अनेकांना वाटते. प्रत्येक नवरा-नवरी आपल्या लग्नाला खास बनवू इच्छित असतात. यासाठी ते अनेकदा अशा काही गोष्टी करतात की बाकी लोक बघतच बसतात. अशातच आता गया शहरातील एक लग्न चर्चेचा विषय बनलं आहे. यामध्ये एक नवरी आपल्या नवरदेवाला घेण्यासाठी घोडीवर बसून येते. सांगितलं जात आहे की ही नवरी एक इअर होस्टेस अनुष्पा गुहाच लग्न पश्चिम बंगालच्या कोलकत्ताला राहणाऱ्या जीत मुखर्जीसोबत झालं. हे लग्न भव्य बनवण्यासाठी खूप तयारी केली गेली पण नवरीने जे केलं त्याची कोणी कल्पनाही केली नव्हती.
नवरीचा जबरदस्त अंदाज
चांदचौरा येथील सुजुआर भवनातून वराला आणण्यासाठी घोड्यावर बसून वऱ्हाडी निघाले. नववधूची स्टाईल पाहून अनेकांनी तिच कौतुक केलं. आता लोक हा मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. त्याचवेळी हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून लोक व्हिडीओवर जोरदार चर्चा रंगली आहे.