जो कुणी काश्मीरच्या डोमोग्राफिक बदलामध्ये सामील होईल, त्याच्यासोबत असंच केलं जाईल

0

दि.२: जम्मू काश्मीरमधील कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी एका बँक कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या (Target Killing In Kashmir) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हत्येची जबाबदारी काश्मीर फ्रीडम फायटर्स या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. या हत्येची जबाबदारी काश्मीर फ्रीडम फायटर्स या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. त्याबरोबरच या दहशतवादी संघटनेने एक पत्र प्रसिद्ध करून जो कुणी काश्मीरच्या डोमोग्राफिक बदलामध्ये सामील होईल, त्याच्यासोबत असंच केलं जाईल, असा इशारा दिला आहे.

काश्मीर फ्रीडम फायटर्सने पत्र प्रसिद्ध करून सांगितले की, कुलगाममध्ये आमच्या कॅडर्सनी गोपनीय माहितीच्या आधारावर ऑपरेशन पूर्णत्वास नेले आहे. यामध्ये एक बँक कर्मचारी विजय कुमार यांचा मृत्यू झाला आहे. काश्मीरमध्ये डेमोग्राफिक बदलामध्ये जे कुणी सहभागी होतील, त्याच्यासोबत हाच परिणाम होईल.

पत्रामध्ये पुढे लिहिले की, जे कुणी बाहेरील लोक मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार त्यांना येथे कायम वास्तव्याची व्यवस्था करेल, अशी स्वप्ने पाहत आहेत, त्यांच्यासाठी हा डोळे उघडणारा इशारा आहे. आता त्यासाठी जीवही गमवावा लागू शकतो, हे बाहेरील लोकांनी लक्षात ठेवावे. लक्षात ठेवा, विचार करा अन्यथा पुढचा नंबर तुमचा लागू शकतो.

गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये टार्गेट किलींगच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. गुरुवारी दहशतवाद्यांनी कुलगाममधील मोहनपोरामधील स्थानिक बँकेत तैनात विजय कुमार यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तत्पूर्वी मंगळवारी दहशतवाद्यांनी एका हिंदू शिक्षिकेची गोळ्या झाडून हत्या केली होती. तर मे महिन्यात दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांची त्यांच्याच कार्यालयात घुसून हत्या केली होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here