terrorist attack: जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये लष्कराच्या चौकीवर दहशतवादी हल्ला

5 जवान आणि एक पोलीस अधिकारी जखमी

0

जम्मू,दि.12: terrorist attack: जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये काल रात्री उशिरा दहशतवाद्यांनी लष्कराच्या चौकीवर हल्ला केला. दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. गोळीबारात पाच जवान आणि एक एसपीओ (विशेष पोलीस अधिकारी) जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे

terrorist attack

कठुआ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू आणि दोन जण जखमी झाल्याच्या काही तासानंतर हा हल्ला झाला. तीन दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर हल्ला केला होता, ती खड्ड्यात पडली, या दहशतवादी हल्ल्यात नऊ प्रवासी ठार झाले, तर 40 हून अधिक जखमी झाले. 

सर्च अॅापरेशन सुरू

माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, तीन नागरिकांची हत्या आणि ओलीस ठेवल्याचे वृत्त खोटे आहे. कठुआ घटनेत फक्त एक नागरिक जखमी झाला आहे. लपलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी कारवाई सुरू आहे. अतिरिक्त पोलिस महासंचालक आनंद जैन यांनी सांगितले की, जिल्ह्याच्या चतरगळा भागात दहशतवाद्यांनी 4 राष्ट्रीय रायफल्स आणि पोलिसांच्या संयुक्त चौकीवर गोळीबार केला.

त्यांनी सांगितले की, सुरक्षा जवानांनी प्रत्युत्तर दिल्याने चकमक सुरू झाली, शेवटची माहिती मिळेपर्यंत चकमक सुरू आहे. कठुआ जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ (IB) एका गावात मंगळवारी संध्याकाळी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एक नागरिक जखमी झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, कठुआ ऑपरेशनमध्ये सुरक्षा दलांनी एका संशयित पाकिस्तानी दहशतवाद्याला ठार केले आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here