एसटी-ट्रकचा कल्याण-नगर महामार्गवर भीषण अपघात, 8 प्रवासी गंभीर जखमी

0

जुन्नर,दि.7: कल्याण-नगर महामार्गवर जुन्नर तालुक्यातील माळशेज घाटाच्या वरच्या बाजूस खुबी गावाजवळ मालवाहू ट्रक व एसटी बसची समोरा समोर धडक बसून अपघात झाला.

यात ट्रक पलटी झाला तर बसचे समोरील बाजूने मोठे नुकसान झाले आहे. बसमधील 7 ते 8 प्रवासी गंभीर जखमी असून यामुळे मोठी वाहतुक कोंडी झाली आहे.

शुक्रवारी रात्री 10.30 च्या दरम्यान हा अपघात झाला असून ठाणे डेपोची बस (क्रमांक एमएचबीटी-2478) यामध्ये धडकली आहे.

अपघातावेळी बसमध्ये एकूण 28 प्रवासी होते. जखमी प्रवाश्यांना स्थानिक ग्रामस्थ व ओतूर पोलिसांनी वैद्यकीय मदत केली. तर अधिक उपचारासाठी त्यांना करंजाळे व ओतूरला हलवले आहे.

घाट परिसरात मागील अनेक दिवसांपासून काँक्रीट रस्त्याचे काम सुरू आहे. परिणामी एकेरी वाहतूक सुरू आहे.

एकाच लेनने दोन्ही बाजूची वाहने प्रवास करत असतात. यातून रस्ता लहान असल्याने समोरासमोर धडक बसून हा अपघात झाला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here