अजित पवारांना सांगू आमचं ऐका, नाहीतर मुख्यमंत्री दिल्लीत गेले आहेत : संजय राऊत

0

पुणे,दि.२६ : शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पिंपरी चिंचवडमध्ये पदाधिकारी मार्गदर्शक मेळावा घेत महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजवले. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी यातील तिन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नाहीत. पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय आला. या वेळी पदाधिकाऱ्यांपुढे आपले विचार मांडताना राऊत यांनी महापालिका निवडणुकीवरुन राष्ट्रवादीला काँग्रेस पक्षाला इशारा दिला आहे.

पुण्याचे पालकमंत्री (उपमुख्यमंत्री अजित पवार) आपले नाहीत,राज्यात आपले राज्य असले तरी इथे आपले कुणी ऐकत नाही असे म्हणतात. असे कसे होईल?. असे होता कामा नये. मुख्यमंत्री शिवेसनेचा आहे. अजित पवार मुख्यमंत्र्यांचे ऐकतात. त्यांनी ऐकले तर बरे होईल. नाहीतर मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत आज. (पत्रकारांना उद्देशून) पण थोडे थांबा, चुकीचे लिहू नका. ते दिल्लीचा अंदाज घ्यायला गेलेत. याचे कारण आम्हाला उद्या दिल्लीवर देखील राज्य करायचे आहे.

चुकीचं ऐकू नका. माझं पूर्ण ऐका मग लिहा. उगाच ब्रेक्रिंग सुरू होईल. दिल्लीचे अंदाज बांधायला लागतील. आपल्याला दिल्लीवर राज्य करायचं. दिल्लीत ऑफिस कुठं आहेत. पंतप्रधान कुठे बसतात याचा अंदाज घेण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीत गेलेत असं संजय राऊत यांनी म्हटलं.

खूप दिवस झाले भोसरीत मेळावा घ्यायचं प्लॅनिंग होतं. इथं स्टेजवर मोठी गर्दी आहे परंतु या भागात आपला एकही नगरसेवक नाही. त्यामुळे स्टेजवर बसलेल्या प्रत्येकाने ३ नगरसेवक निवडून आणले तरी महापालिकेत सत्ता आपली येईल. पुढील काळात पिंपरी चिंचवडचा महापौर आपलाच असेल. नुसतं पद आहे म्हणून नव्हे तर शिवसैनिकांच्या मनगटात ताकद होती म्हणून महाराष्ट्रात आपली सत्ता आली असंही राऊत यांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here