Telangana: BRS आमदार दुर्गम चिन्नैय्या यांनी टोल कर्मचाऱ्यास मारली चापट, व्हिडिओ व्हायरल

0

मुंबई,दि.4: Telangana News: BRS (Bharat Rashtra Samithi) आमदार दुर्गम चिन्नैय्या (BRS MLA Durgam Chinnaiah) यांनी टोल कर्मचाऱ्यास मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाला आहे. तेलंगणाच्या मंडामारी टोल प्लाझावर भारत राष्ट्रीय समिती म्हणजे बीआरएसच्या आमदार दुर्गम चिन्नैय्या यांनी एका टोल कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. आमदाराने टोल कर्मचाऱ्यासोबत मारहाण केल्याचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सीसीटीव्ही फुटेज असलेल्या या व्हिडिओत आमदार महाशय टोल कर्मचाऱ्यास मारहाण करताना दिसून येत आहेत.

टोल कर्मचाऱ्यास मारहाण | Telangana News

मंडामारी सर्कलच्या पोलिसांनी सांगितले की, बीआरएसचे आमदार दुर्गम चिन्नैय्या यांनी मंडामारीच्या टोल प्लाझावर एका कर्मचाऱ्यासमवेत मारहाण केली. याबाबत अद्याप पोलीस स्टेशनला कुठलीही तक्रार नाही. मात्र, याप्रकरणाचा तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, टोल कर्मचाऱ्याने गाडी अडवल्यामुळे आमदाराला राग आला, त्यातूनच ही मारहाण करण्यात आल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. 

काय म्हणाले आमदर? | BRS MLA Durgam Chinnaiah

BRS आमदार दुर्गम चिन्नय्या यांनी मंचेरियल जिल्ह्यातील मंडामारी टोल प्लाझा येथे एका कर्मचाऱ्याला चापट मारली. हा टोलनाका गेल्या महिन्यातच सुरू झाला. आमदारांचे वाहन टोल प्लाझाजवळ येताच कर्मचाऱ्याने प्रोटोकॉल न पाळता त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आमदार संतप्त झाले आणि त्यांनी गाडीतून खाली उतरून कर्मचाऱ्याला चोप दिला. आमदार म्हणाले की, रस्त्याचे काम पूर्ण झालेले नसताना टोल आकारणी कशी केली जात आहे.

ही घटना टोल प्लाझा येथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कसे आमदार टोल कर्मचाऱ्याला चापट मारतात आणि रागाने तेथून निघून जातात. त्याचवेळी चापट मारल्यानंतर कर्मचारी तेथून पळून जातो. याबाबत मंडामारी सर्कल इन्स्पेक्टर म्हणाले, ‘आम्ही सोशल मीडियावर व्हिडिओ पाहिला आहे. आमच्याकडे कोणतीही तक्रार आलेली नाही. आम्ही प्रकरणाचा तपास करत आहोत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here