Tataने लॉंच केले Neu सुपर अ‍ॅप, एकाच ठिकाणी मिळणार सर्व सुविधा

0

दि .7: Tataने Neu सुपर अ‍ॅप लॉंच केले आहे. एकाच ठिकाणी सर्व सुविधा मिळणार आहेत. टाटा ग्रुपचे (Tata Group) बहुप्रतिक्षित पहिले अ‍ॅप Tata Neu अखेर लाँच झाले आहे. हे एक सुपर अ‍ॅपप्रमाणे काम करेल. या एकाच अ‍ॅपमध्ये यूजर्सला ग्रोसरी, इलेक्ट्रॉनिक्स, फूड डिलिव्हरी, गुंतवणुकीसह हॉटेल आणि फ्लाइट बुकिंगची सुविधा दिली जाईल. टाटा डिजिटल गेल्या अनेक महिन्यांपासून या अ‍ॅपवर काम करत होते. या अ‍ॅपसोबतच टाटाने पेमेंट्स आणि फूड डिलिव्हरीसह अनेक ऑनलाइन सेक्टर्समध्ये एंट्री केली आहे. आज संध्याकाळी Lucknow Super Giants आणि Delhi Capital मध्ये होणाऱ्या मॅच दरम्यान हे अ‍ॅप लाईव्ह होईल. खास गोष्ट म्हणजे कंपनी यूजर्सला मोफत IPL 2022 च्या मॅचचे तिकीट्स देखील देत आहे.

Tataने Neu सुपर अ‍ॅप लॉंच केले आहे. एकाच ठिकाणी सर्व सुविधा मिळणार आहेत. टाटा ग्रुपचे (Tata Group) बहुप्रतिक्षित पहिले अ‍ॅप Tata Neu अखेर लाँच झाले आहे. हे एक सुपर अ‍ॅपप्रमाणे काम करेल. या एकाच अ‍ॅपमध्ये यूजर्सला ग्रोसरी, इलेक्ट्रॉनिक्स, फूड डिलिव्हरी, गुंतवणुकीसह हॉटेल आणि फ्लाइट बुकिंगची सुविधा दिली जाईल. टाटा डिजिटल गेल्या अनेक महिन्यांपासून या अ‍ॅपवर काम करत होते. या अ‍ॅपसोबतच टाटाने पेमेंट्स आणि फूड डिलिव्हरीसह अनेक ऑनलाइन सेक्टर्समध्ये एंट्री केली आहे. आज संध्याकाळी Lucknow Super Giants आणि Delhi Capital मध्ये होणाऱ्या मॅच दरम्यान हे अ‍ॅप लाईव्ह होईल. खास गोष्ट म्हणजे कंपनी यूजर्सला मोफत IPL 2022 च्या मॅचचे तिकीट्स देखील देत आहे.

सर्व पेमेंट्ससाठी एक अ‍ॅप

या अ‍ॅपमध्ये कंपनी टाटा पे (Tata Pay) सर्विस देखील ऑफर करत आहे. याद्वारे ब्रॉडबँडस वीज, गॅस, लँडलाइन बिल भरण्यासोबतच डीटीएच आणि मोबाइल रिचार्ज देखील करू शकता. तसेच, यात यूपीआय पेमेंटचा देखील पर्याय मिळेल. टाटा पे थेट फोन पे आणि गुगल पे सारख्या अ‍ॅप्सला टक्कर देईल.

इन्वेस्टमेंट आणि फायनान्स

Tata Neu अ‍ॅपमध्ये यूजर्सला गुंतवणूक व फायनान्ससंबंधी सर्विस देखील मिळेल. यात इंस्टंट पर्सनल लोन, Buy Now Pay Later, डिजिटल गोल्ड आणि विमासह अनेक सुविधा आहेत. याशिवाय, यात होम सिक्योरिटी आणि सिक्योर ऑनलाइन कार्ड ट्रांजॅक्शन सारखे पर्याय देखील आहेत.

जेवण देखील करू शकता ऑर्डर

टाटाचे हे अ‍ॅप फूड डिलिव्हरी सर्विस देखील देते. यामध्ये ताज हॉटेल ग्रुपच्या जेवणाचा मेन्यू उपलब्ध आहे. अ‍ॅपमध्ये फूड मेन्यू सध्या मर्यादित आहे. पुढील काही दिवसात कंपनी फूड मेन्यूमध्ये इतर पर्याय उपलब्ध करेल.

मोफत पाहा IPL

टाटा IPL 2022 चा स्पॉन्सर आहे. त्यामुळे कंपनी यूजर्सला मोफत आयपीएल मॅच पाहण्यासाठी तिकीट जिंकण्याची संधी देत आहे. मॅच मोफत पाहण्यासाठी तुम्हाला Tata Neu च्या इंस्टाग्राम हँडलवर जावून Neu Quiz चे उत्तर द्यावे लागेल. अचूक उत्तर देणाऱ्या यूजर्सला मॅचचे मोफत तिकीट मिळेल.

Neu Coins आणि फ्लाइट बुकिंग

Tata Neu अ‍ॅपमध्ये Neu Coins फीचर देखील दिले आहे. या कॉइन्सद्वारे यूजर्स अ‍ॅप आणि ऑफलाइन टाटा स्टोर्समध्ये शॉपिंग करू शकतात. Tata Neu ला स्टारबक्स, टाटा प्ले आणि यूटिलिटी बिल्ससाठी वापरता येईल. तसेच, १ रुपये मूल्य असलेल्या या कॉइन्सचा वापर तुम्ही एअर एशियाची फ्लाइट बुक करण्यासाठी, बिग बास्केट, क्रोमा, टाटा क्लिक, वेस्टसाइट आणि टाटा १ mg वरून ऑर्डर करण्यासाठी करू शकता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here