टाकळी ते सोरेगाव जलवाहिनी उद्या एक दिवस राहणार बंद

0

सोलापूर दि.22 : टाकळी येथील पंप बंद ठेवण्यात येणार असल्याने येत्या शुक्रवारपासून एक रोटेशन शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे जाईल, अशी माहिती महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी यांनी दिली.

केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत टाकळी पंप हाऊस येथे नवीन पंप जोडणीसाठी आवश्यक असलेली कामे करण्यात येणार आहेत. याशिवाय सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्र येथेही सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी केबल जोडणीचे काम केले जाणार आहे.

उद्या गुरुवारी याच कामासाठी टाकळी पंप बंद ठेवावा लागेल. दुरुस्तीचे काम पूर्ण होण्यास सात ते आठ तास लागतील. दरम्यान सोरेगाव ते टाकळी जलवाहिनी बंद राहील. त्यामुळे २४ सप्टेंबर रोजीचा संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा एक वेळ, एक रोटेशन एक दिवसाने पुढे जाईल. या कालावधीत शहरासह हद्दवाढ भागातील पाणीपुरवठा उशिरा, कमी दाबाने होणार आहे. नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन धनशेट्टी यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here