मुंबई,दि.4: रेल्वे मंत्रालय एक नवीन सुपर अॅप स्वरेल (SwaRail SuperApp) आणत आहे. सध्या हे अॅप बीटा व्हर्जनमध्ये आहे. या अॅपद्वारे ऑनलाइन तिकीट बुकिंग, फूड ऑर्डरिंग आणि पीएनआर तपासणीसह अनेक कामे करता येतात. आतापर्यंत या सर्व सुविधांसाठी वेगवेगळे अॅप्स किंवा पोर्टल आवश्यक होते. परंतु आता सर्व सुविधा एकाच अॅपवर उपलब्ध असतील.
या अॅपवर प्रवाशांना रेल्वेकडून दिल्या जाणाऱ्या सर्व सेवांचा लाभ घेता येणार आहेत. भारतीय रेल्वेचे हे नवीन सुपर अॅप सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्सने (CRIS) विकसित केले आहे. सध्या हे अॅप अँड्रॉइड आणि आयओएस प्लॅटफॉर्मवर बीटामध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
हे अॅप रेल्वे माहिती प्रणाली केंद्र म्हणजेच CRIS ने विकसित केले आहे. स्वारेल सुपरअॅपद्वारे, वापरकर्ते आरक्षित आणि अनारक्षित तिकिटे ऑनलाइन बुक करू शकतील. तसेच, प्लॅटफॉर्म तिकिटे ऑनलाइन बुक करता येतात. याशिवाय, अॅपवर पार्सल आणि डिलिव्हरीचा मागोवा घेता येतो. याशिवाय, तुम्ही अॅपच्या मदतीने ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करू शकाल. याशिवाय, तुम्हाला रेल मदतकडून तक्रार नोंदवण्यासोबतच माहितीही मिळू शकेल. अॅपमध्ये कोचची जागा आणि परतावा दावा सुविधा उपलब्ध असतील.