मुंबई,दि.21: Susanta Nanda: IFS अधिकाऱ्याने वाघ आणि हरणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात. यात प्राण्यांचे व्हिडिओ तुफान व्हायरल होतात. वाघ हा जंगलातील सर्वात भयानक शिकारी मानला जातो, हे सर्वांनाच माहीत आहे. बंगाल टायगरचा वेग आणि चपळता अशी आहे की एकदा त्याने एखाद्याला आपला बळी बनवायचं ठरवलं की मग समोरच्या प्राण्याचं त्याच्या तावडीतून वाचणं अशक्य होऊन जातं. कधी लपून हल्ला करून तर कधी समोरून हल्ला करून शिकारीला पकडणं हा बंगाल टायगरच्या मूळ प्रवृत्तीचा भाग आहे. जंगलात अनेकदा शिकारींच्या हाती हरणं सहज येतात. मात्र यावेळी वाघाचा सामना अशा हरणाशी झाला, जे त्याच्या तावडीतून अगदी सहज निसटलं.
IFS अधिकाऱ्याने शेअर केला वाघ आणि हरणाचा व्हिडिओ | Susanta Nanda
IFS सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर पश्चिम बंगालमधील सुंदरबनचा असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये वाघ हरणाची शिकार करण्यासाठी मेहनत करताना दिसत आहे. पण हरणाने त्याला अशी हुलकावणी दिली की त्या बिचाऱ्याला हताश व्हावं लागलं. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या हरणाला अनेकांनी सर्वात भाग्यवान हरीण म्हटलं आहे.
काय आहे व्हिडीओमध्ये?
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये जंगलाच्या मध्यभागी हरणांचा कळप पाहून भयंकर वाघ शिकार करण्याचा निर्णय घेतो. आधी तो सगळं पाहतो, मग संधी मिळताच तो त्यांच्यावर झडप घालतो. पण तो हरणाला पकडण्याआधीच हरीण इकडे तिकडे पळू लागतं आणि नदीत उडी मारतं. वाघाने हरणाच्या मागे नदीत उडी मारली. पण हरणाने अशा प्रकारे डुबकी मारली की वाघ त्याचा शोध घेत राहिलं आणि शेवटी त्याला रिकाम्या हाती परतावं लागलं. त्यांच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती.
जंगलातील शिकारीचा हा मजेदार व्हिडिओ IFS सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. जो @Plchakraborty या अकाऊंटवरुन घेतला गेला आहे. व्हिडिओ शेअर करण्यासोबतच कॅप्शनमध्ये लिहिलं – पश्चिम बंगालच्या सुंदरबनमध्ये हरणाचा पाठलाग करणाऱ्या रॉयल बंगाल टायगरचा हा अप्रतिम व्हिडिओ तुम्हाला थक्क करेल. 24-परगणा दक्षिण वनविभागाच्या रामगंगा रेंजमधील चुलकाठी कॅम्पमधील वनसहाय्यक अनूप कायल यांनी हा व्हिडिओ मोबाईल फोनवर शूट केला होता.