Survey: लोकसभेची आज निवडणूक झाल्यास महाराष्ट्रात भाजपा शिंदे गटाला मोठा धक्का बसणार

0

सोलापूर,दि.12: Survey: देशात अनेक समस्या आहेत, काहींना महागाईने त्रस्त तर काहींना रोजगाराची गरज आहे. या मुद्द्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी इंडिया टुडे सी-वोटरसह ‘देशाचा मूड’ जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. या सर्वेक्षणात 1.22 लाखांहून अधिक लोकांचे मत नोंदवले गेले आहे. या सर्वेक्षणात, असे सर्व प्रश्न विचारण्यात आले होते जे लोकांमध्ये चर्चेत आहेत किंवा ज्या समस्यांबद्दल जनता चिंतेत आहे. फेब्रुवारी ते 9 ऑगस्ट या कालावधीत हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील सत्तानाट्यानंतर महिन्याभरापूर्वी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या काही आमदारांनी भाजसोबत राज्यात सरकार स्थापन केलं. दरम्यान, काही नुकतान राज्यातील सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तारही पार पडला.

सध्या आगामी लोकसभा निवडमुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता कोणच्या बाजूनं कौल देणार याची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. राज्यात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये मोठा विजय मिळवण्याचा दावा भाजपनं यापूर्वीही केला होता. दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकहाती जिंकण्याचाही त्यांचा मानस आहे. परंतु नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणातून राज्यात भाजप आणि शिंदे गटासाठी पुढील वाटचाल कठीण असल्याचं दिसून येत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र निवडणूक लढवल्यास त्यांना त्याचा फायदा मिळण्याची शक्यता सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आलीये. तर दुसरीकडे याचा फटका मात्र भाजप शिंदे गटाला बसू शकतो.

इंडिया टुडे आणि सी व्होटर्सनं केलेल्या सर्वेक्षणानुसार आज जर लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या, तर महाराष्ट्रात युपीएला 48 पैकी 30 जागा मिळण्याचा अंदाज बांधण्यात आला आहे. तर भाजपप्रणित एनडीला 18 पर्यंत जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. असं झाल्यास ही भाजपसाठी धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता आहे. यापूर्वी 2019 मध्ये भाजप आणि शिवसेनेनं लोकसभेत एकत्र निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना तब्बल 42 जागांवर विजय मिळाला होता. दरम्यान, शिवसेनेच्या अनेक खासदारांनी नुकताच एकनाथ शिंदे यांना पाठींबा दिला आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्यासोबत सहा खासदार आहेत. दरम्यान, सध्या आमदारांच्या अपात्रतेवरही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

देशात अनेक समस्या आहेत, काहींना महागाईने त्रस्त तर काहींना रोजगाराची गरज आहे. या मुद्द्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी इंडिया टुडे सी-वोटरसह ‘देशाचा मूड’ जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. या सर्वेक्षणात 1.22 लाखांहून अधिक लोकांचे मत नोंदवले गेले आहे. या सर्वेक्षणात, असे सर्व प्रश्न विचारण्यात आले होते जे लोकांमध्ये चर्चेत आहेत किंवा ज्या समस्यांबद्दल जनता चिंतेत आहे. फेब्रुवारी ते 9 ऑगस्ट या कालावधीत हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

गेल्या काही महिन्यांत देशात महागाई झपाट्याने वाढली आहे. विरोधकांनी सरकारविरोधात रस्त्यापासून संसदेपर्यंत मोर्चा उघडला आहे. या मुद्द्याचाही सर्वेक्षणात समावेश करण्यात आला आहे.

सर्वेमध्ये लोकांना विचारण्यात आले आहे की, सध्या देशातील सर्वात मोठी समस्या कोणती आहे? सुमारे 27 लोक महागाईचा विचार करतात, तर 25 टक्के लोकांसाठी बेरोजगारी आणि 7 टक्के लोकांसाठी गरिबी ही सर्वात मोठी समस्या आहे. त्याचवेळी भ्रष्टाचार ही सध्याची सर्वात मोठी समस्या असल्याचे 6 टक्के लोकांचे मत आहे. 6 टक्के लोक कृषी संकट पाहतात आणि 3 टक्के लोक धार्मिक संघर्षाला मोठी समस्या म्हणून पाहतात.

सर्वेक्षणात बेरोजगारीबाबत वेगळा प्रश्न विचारण्यात आला होता. ज्यावर 56 टक्के लोकांनी सांगितले की बेरोजगारी ही देशातील ‘अत्यंत गंभीर’ समस्या आहे. 17% लोक बेरोजगारी ही ‘गंभीर’ समस्या मानतात. तर 9 टक्के लोक सरकारवर समाधानी असून 18 टक्के लोकांनी कोणतेही मत दिले नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here