शिवसेना पक्ष व चिन्हाबाबत सुनावणी सर्वोच्च न्यायालयात या तारखेपासून होणार

0

मुंबई,दि.9: शिवसेना पक्ष व चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व चिन्ह शिंदे गटाला दिले. या निर्णयाला शिवसेना ठाकरे गटाने न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायालयीन लढाई आता निर्णायक टप्प्यावर पोहचली आहे.

सत्तासंघर्षाशी संबंधित सर्व याचिकांवर पुढील आठवडय़ात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत 15 जुलैला तर शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत 19 जुलैला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि घडय़ाळ हे निवडणूक चिन्ह याबाबत 16 जुलैला तर अजित पवार गटाच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील याचिकेवर 23 जुलैला सुनावणी होणार आहे.

शिवसेनेत फूट पाडून महाराष्ट्रात स्थापन झालेल्या शिंदे सरकारमधील आमदारांची अपात्रता. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

या दोन्ही प्रकरणांवर गेल्या अनेक महिन्यांपासून सुनावणी झालेली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतरच्या नियमित कामकाजात या दोन्ही प्रकरणांवर सुनावणी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार पक्षाच नाव आणि चिन्हाबाबत 15 जुलै रोजी, तर आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर 19 जुलैला सुनावणी होणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here