Supreme Court On BJP | तुमचा प्रतिस्पर्धी हा तुमचा शत्रू नसतो याचे भान ठेवा: सर्वोच्च न्यायालय

0

नवी दिल्ली,दि.28: Supreme Court On BJP: तुमच्या अशा गोष्टींना आम्ही अजिबात प्रोत्साहन देऊ शकत नाही असे सर्वोच्च न्यायालय म्हणत भाजपाला फटकारले आहे. तुमचा प्रतिस्पर्धी हा तुमचा शत्रू नसतो याचे भान ठेवा. देशात राजकीय कटुता वाढत चालली असून आम्ही त्याला प्रोत्साहन देऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या जाहिराती नक्कीच करू शकता. पण, उच्च न्यायालय तुमचे म्हणणे ऐकून घेत असेल तर त्यात आम्ही आडकाठी आणणार नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने आज भाजपला फटकारले. 

काय आहे प्रकरण? | Supreme Court On BJP

भाजपने केलेल्या तृणमूल संबंधीच्या जाहिराती आम्ही पाहिल्या आहेत. त्या बदनामीकारकच आहेत. तुमच्या अशा गोष्टींना आम्ही अजिबात प्रोत्साहन देऊ शकत नाही, असे सांगत तृणमूलविरोधातील भाजपच्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला.

तृणमूल काँग्रेसची कथित बदनामी करणाऱ्या आणि आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या जाहिराती लोकसभा निवडणुकांच्या काळात प्रसिद्ध करण्यास भाजपला कोलकाता उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाने 4 जूनपर्यंत मनाई केली आहे. या आदेशांविरुद्ध भाजपने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

लोकसभा निवडणुकांच्या काळात तृणमूल काँग्रेसची कथित बदनामी करणाऱ्या आणि आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करण्यास भाजपला कोलकाता उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाने 4 जूनपर्यंत मनाई केली आहे. या आदेशांविरुद्ध भाजपने दाखल केलेली विशेष सुट्टीकालीन याचिका सुनावणीसाठी आल्यावर खंडपीठाने भाजपलाच फैलावर घेतले.

हायकोर्टाचे न्यायमूर्ती सब्यसाची भट्टाचार्य यांनी तृणमूल काँग्रेसने भाजपच्या जाहिरातींच्या विरोधात केलेल्या तक्रारींचे योग्य वेळी निराकरण करण्यात निवडणूक आयोग पूर्णपणे अयशस्वी ठरल्याचे ताशेरे ओढले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here