Sujit Patkar Arrested: ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या अडचणी वाढणार?

0

मुंबई,दि.20: Sujit Patkar Arrested: ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जाणाऱ्या सुजित पाटकर यांना ईडीने अटक केली आहे. सुजित पाटकर यांच्यावर मुंबई महापालिकेतील कोव्हीड सेंटरमध्ये घोटाळ्याचा आरोप आहे. ईडीकडून बीएमसी कोव्हीड सेंटर घोटाळा प्रकरणाचा तपास सुरू आहे.

सुजित पाटकर यांना अटक | Sujit Patkar Arrested

या प्रकरणात पाटकर यांना बुधवारी रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर आता त्यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सुजित पाटकर हे ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे निकटवर्तीय समजले जातात.

त्यामुळे आता संजय राऊत यांच्या अडचणीत देखील वाढ होण्याची शक्यता आहे. सुजित पाटकर यांच्यासह आणखी दोघांना अटक झाल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच सुजित पाटकर यांच्याशी संबंधित या प्रकरणात ईडीने राज्यात काही ठिकाणी छापे टाकले होते. मुंबईत पंधराहून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. बीएमसीचे वरिष्ठ अधिकारी, पुरवठादार आणि शहरात कोविड मशिन्स उभारण्यासाठी मदत करणाऱ्या लोकांच्या घरावर हे छापे टाकले गेले होते. अखेर या प्रकरणात आता ईडनं सुजित पाटकर यांना अटक केली आहे. त्यांच्यासह आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here