सोलापूर,दि.२४: Subramanian Swamy On Shinde-Fadnavis Government: भाजपाचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) अनैतिक असल्याचे म्हटले आहे. सुब्रमण्यम स्वामी आज सोलापूरमधील पंढरपूरमध्ये होते. पंढरपूरमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर यांनी हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात बनलेलं सरकार अनैतिक असून सुप्रीम कोर्टात सध्या केस सुरु आहे, असा घरचा आहेर सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार हे हिंदुत्ववादी नाही, असं देखील स्वामी म्हणाले.
शिंदे-फडणवीस सरकार अनैतिक | Subramanian Swamy On Shinde-Fadnavis Government
महाराष्ट्रात जून महिन्यात स्थापन झालेलं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील सरकार अनैतिक असल्याचा आरोप सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टातील केसचा दाखला दिला आहे. भाजपच्या नेत्याकडूनचं राज्यातील शिंदे सरकारला हा घरचा आहेर मानला जात आहे.

नरेंद्र मोदी हिंदुत्ववादी नाहीत | Subramanian Swamy News
पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदुत्ववादी नाहीत, असे धक्कादायक विधान भाजपचे माजी खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे. पंढरपूर मधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सरकारच्या ताब्यातून मुक्त करण्याच्या बद्दल चर्चा करण्यासाठी सुब्रमण्यम स्वामी आज पंढरपूर मध्ये आले होते.

मोदींनी कोणते चर्चचे सरकारीकरण केले का?
पंतप्रधान मोदींनी कोणते चर्चचे सरकारीकरण केले का? १९४७ नंतर चर्च मशीद ताब्यात घेतली नाही. मग हिंदूंनी कोणते पाप केले आहे. मोदी हिंदुत्ववादी नाहीत. त्यांनी उत्तराखंड मध्ये अनेक मंदिरे सरकारीकरण केले. न्यायालयात जाऊन ती मुक्त करणार आहे. मी भाजपच्या जाहीरनाम्या नुसार काम करणार आहे, असं सुब्रमण्यम स्वामी म्हणाले. जम्मू काश्मीर मधील कलम ३७० कलम हटवण्यासाठी मी अमित शाह यांना मार्गदर्शन केले, असं स्वामी म्हणाले.
सुब्रमण्यम स्वामी यांनी महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर देखील भाष्य केलं. महाराष्ट्रामधील शिंदे फडणवीस सरकार अनैतिक आहे. त्यांचं प्रकरण न्यायालयत प्रलंबित आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली आहे.
सुब्रमण्यम स्वामी यांच्या वक्तव्यावर महाराष्ट्रातील भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते काय बोलणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.