मिरवणुकीसाठी जाणाऱ्या तरूणांवर सोलापुरात दगडफेक

0

सोलापूर,दि.२३: देशभरात राम मंदिर कार्यक्रमाचा उत्साह आहे. सोलापूर शहरातील शास्त्रीनगर परिसरात सोमवारी दुपारी ४.३० च्या सुमारास जमावाकडून दगडफेक करण्यात आली. यामध्ये तिघेजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी चौकशीसाठी काहीजणांना ताब्यात घेतले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

सत्यनारायण निमकंठी (वय ३३, रा. गोदुताई विडी घरकूल), नागेश लिंगप्पा हत्तुरे (वय २०), सागर सूर्यकांत गलांडे (वय ३३, दोघे रा. विजापूर नाका झोपडपट्टी नं. २) अशी जखमींची नावे आहेत. सोमवारी दुपारी ४.३० च्या सुमारास काही तरुण शास्त्रीनगर भागातून मिरवणुकीसाठी जात होते. त्यावेळी अज्ञात तरुणांनी त्यांच्यावर दगडफेक केली.

या दगडफेकीत तिघेजण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर काही संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, घटनास्थळावरून पोलिसांनी काही दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

या दुचाकींच्या मालकांचा शोध पोलीस घेत आहेत. अचानक घडलेल्या दगडफेकीच्या घटनेमुळे परिसरात तणावाची परिस्थती निर्माण झाली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विजय कबाडे, पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here