गोवा राज्य निर्मित दारुचा साठा जप्त ट्रकसह ५६ लाखांचा ऐवज हस्तगत

0

सोलापूर,दि.४ : राज्य उत्पादन शुल्कच्या पुणे विभागीय भरारी पथकाने माळशिरस व पंढरपूर विभागासमवेत गोवा राज्य निर्मित दारुचा साठा जप्त केला आहे. ट्रकसह ५६ लाख ३० हजारांचा ऐवज हस्तगत करुन एकाला अटक करण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे विभागीय भरारी पथकाने माळशिरस व पंढरपूर विभागासमवेत सांगोला तालुक्यात कटफळ हद्दीत आटपाडी-पंढरपूर रोडवर हॉटेल किनारासमोर छापा टाकला.

गोवा राज्य निर्मित व विक्रीस परवानगी असलेले इम्पिरियल ब्लू व्हिस्की ७५० मि.ली. चे ७५ बॉक्स, इम्पिरियल ब्लू व्हिस्की १८० मिलीचे ४९८ बॉक्स, रॉयल चॅलेंज व्हिस्की ७५० मिलीच्या ५४० बाटल्या तसेच टाटा कंपनीचा सहाचाकी ट्रक (एमएच१४ एच् ४४९५) व इतर साहित्य असा एकूण ५६ लाख २९ हजार ९७५ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. या गुन्ह्यामध्ये ज्ञानेश्वर अशोक भोसले (वय ३१, रा. पोखरापूर, ता. मोहोळ) यास अटक केली आहे.

या कारवाईमध्ये निरीक्षक दिगंबर शेवाळे, दुय्यम निरीक्षक संजय बोधे, शहाजी गायकवाड, सहायक दुय्यम निरीक्षक प्रवीण पुसावळे, गणेश सुळे, जवान प्रताप कदम, अमर कांबळे, अहमद शेख, भरत नेमाडे, शशांक झिंगळे यांनी सहभाग घेतला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here