नाशिक,दि.15: महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र आणि नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने U19 वर्षातील जूनिअर राज्य अजिंक्यपद टेनिस क्रिकेट स्पर्धेचे नाशिकमध्ये आयोजन करण्यात आले आहे. नाशिक येथील सय्यद पिंपरी क्रीडा संकुलन नाशिकच्या मैदानावर 17 से 20 डिसेंबर 2023 दरम्यान ही स्पर्धा होणार असल्याची माहिती स्पर्धेचे स्वागताध्यक्ष महाराष्ट्र राज्य सचिव मिनाक्षी गिरी व नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड यांनी दिली.
महाराष्ट्रभरातून विविध जिल्ह्यातील 24 संघ या स्पर्धेत समावेश होणार आहे त्यामध्ये यजमान संघ नाशिक पण सहभागी होणार असून स्पर्धेचे उद्घाटन सोमवार (18 डिसेंबर) सायंकाळी 5.00. वाजत संपन्न होणार आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनचे फाउंडर कन्हैया गुजर उपस्थित राहणार आहेत.
खेळाडूची राहण्याची व्यवस्था, पदाधिकारी व पंच यांची व्यवस्था जनार्दन स्वामी पर्णकुटी नाशिक येथे करण्यात आली आहे.