एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन: वाहतूक नियंत्रक मनोज मुदलीयार यांची प्रकृती खालावली

0

उपचारासाठी श्री छत्रपती सर्वोपचार रुग्णालयात दाखल

सोलापूर,दि.१३ : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे यासाठी राज्यभरातील राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी हे आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहे. ठीक ठिकाणी कर्मचारी हे बेमुदत आमरण उपोषण करत आहेत. सोलापुरातही एसटी वाहतूक नियंत्रक मनोज मुदलियार यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. चार दिवसापासून त्यांचे आंदोलन सुरू आहे, एसटीचे अधिकारी आंदोलन मागे घेण्यासाठी समजूत काढत आहेत मात्र कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.

एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. संघर्ष एसटी युनियन आणि कनिष्ठ वेतन श्रेणी या संघटनांनी संपाचं नेतृत्व स्वीकारलं. मागील जवळपास १६ दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी संपामुळं एकामोमाग एक एसटी बस डेपो बंद पडत गेले. कामगारांचं आंदोलन उग्र होत गेल्यामुळं बहुतेक बस आगारातच उभ्या होत्या. सोलापुराही आंदोलन सुरू आहे.

शनिवारी आंदोलनकर्ते मनोज मुदलियार यांची प्रकृती खालावली त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले, मुदलीयार यांच्यासोबत एसटीचे अनेक कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वाहतूक नियंत्रक विलास राठोड, आगार व्यवस्थापक कुलकर्णी यांनी समजण्याचा प्रयत्न केला. मात्र एसटी कर्मचारी ऐकणास तयार नसल्याचे दिसून आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here