SSC HSC Exam Solapur: दहावी, बारावी परीक्षा केंद्राच्या परिसरात कलम 144 व 37 (3) लागू

0

सोलापूर,दि.20: SSC HSC Exam Solapur: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जिल्ह्यात दिनांक 21 फेब्रुवारी ते 21 मार्च 2023 या कालावधीत इयत्ता बारावीची व दिनांक 02 मार्च ते 25 मार्च 2023 या कालावधीत इयत्ता दहावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सोलापूर ग्रामीण जिल्ह्याच्या परीक्षा केंद्राच्या 100 मिटर परिसरात दिनांक 21 फेब्रुवारी ते 25 मार्च 2023 या कालावधीत सकाळी 9.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) कलम 144 व कलम 37 (3) चे आदेश लागू करण्यात आले आहेत. अपर जिल्हादंडाधिकारी शमा पवार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. (SSC HSC Exam 2023)

यावर राहणार बंदी | SSC HSC Exam 2023

या कालावधीत फौजदारी संहिता 1973 चे कलम 144 अन्वये सकाळी 9.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत परीक्षा केंद्राभोवती 100 मीटर परिसरात असलेली झेरॉक्स केंद्र, फॅक्स, ई-मेल, इंटरनेट, मोबाईल फोन, वायरलेस सेट, ट्रान्झिस्ट्रर यांचा वापर करण्यास बंदी आहे. हा बंदी आदेश परीक्षा केंद्रात व केंद्राभोवती परीक्षा कामासाठी नेमलेल्या अधिकारी, कर्मचारी तसेच बंदोबस्तावर असणारे सुरक्षा कर्मचारी , पोलीस अधिकारी व कर्मचारी व अन्य शासकीय कर्मचारी यांना लागू नाही.

पाचपेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास… | SSC HSC Exam Solapur

तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये सकाळी 9.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत परीक्षा केंद्राभोवती 100 मीटर परिसरात पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास बंदी आहे. हा बंदी आदेश परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थी ,विद्यार्थींना सोडण्यास आलेल्या पालकांना, केंद्र व्यवस्था पाहणाऱ्या परिक्षक, सुपरवायझर, शिपाई व शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या व्यक्तींना लागू नाही.

जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षा आणि कामकाज सुयोग्य पध्दतीने होण्यासाठी व तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी पवार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here