वीरशैव व्हीजनच्या सिद्ध सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

सोलापूर,दि.16 : वीरशैव व्हीजनतर्फे घेण्यात आलेल्या सिद्ध सजावट स्पर्धेला गतवर्षीप्रमाणे यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी दिली.

कोरोनामुळे यंदाही ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेवर निर्बंध आले आहेत. अशावेळी घरबसल्या भक्तांना सिद्धेश्वरांची भक्ती करता यावी, त्यांचे जीवन चरित्र समजून घेता यावे, त्यांनी केलेल्या कार्याचा परिचय व्हावा तसेच भक्तांच्या कल्पकतेला आणि सृजनशीलतेला वाव मिळावा यासाठी ‘सिद्ध सजावट स्पर्धा 2022’ घेण्यात आली.

स्पर्धेसाठी सिद्धरामेश्वरांचे अध्यात्मिक आणि धार्मिक कार्य, सिद्धरामेश्वरांचे विचार, सिद्धरामेश्वरांचे समाजीक कार्य, सिद्धरामेश्वर यात्रेतील विधी, गड्डा यात्रा, सिद्धरामेश्वर मंदिर परिसर, श्री सुवर्ण सिद्धेश्वर असे विषय ठेवले होते.

या स्पर्धेत 526 स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धकांनी स्पर्धेतील विषयांवर आधारित अशा वैविध्यपूर्ण कलाकृती सादर केल्या. स्पर्धेचे परीक्षण चित्रकार देवेंद्र निंबर्गीकर व शिल्पकार महेश हलशेट्टी करत आहेत. लवकरच बक्षीस वितरणाची तारीख, वेळ आणि स्थळ कळवण्यात येणार आहे.

स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रथम 21 हजार, द्वितीय 15 हजार, तृतीय 13 हजार, चतुर्थ 11 हजार पाचवे 10 हजार, सहावे 9 हजार, सातवे 8 हजार, आठवे 7 हजार, नववे 6 हजार, दहावे 5 हजार, अकरावे 4 हजार बारावे 3 हजार तर 5 उत्तेजनार्थ विजेत्यांना प्रत्येकी 1 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच सर्व विजेत्यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र तर सर्वच सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देण्यात येणार आहे.

यावेळी बसवराज जमखंडी, धानेश सावळगी, सचिन विभुते, विजय कुमार हेले, आनंद दुलंगे, विजय बिराजदार, चिदानंद मुस्तारे, राजेश नीला, सोमेश्वर याबाजी, अमोल कोटगोंडे, गंगाधर झुरळे आदी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here