विद्यार्थ्यांना मदत करण्यात आत्मिक समाधान : डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य

0

सोलापूर,दि.१४: श्री काशीपीठाच्या वतीने गरीब, गरजू आणि प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्ती योजनेसाठी समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी हातभार लावलेला आहे. विद्यार्थ्यांना मदत करण्यामध्ये त्या दानशूर व्यक्तींना आणि आम्हाला आत्मिक समाधान लाभते. या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचा विकास म्हणजे राष्ट्राचा विकास होय असे प्रतिपादन काशी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले.

श्री काशीपीठाच्या शिष्यवृत्ती योजनेत योगदान देणाऱ्या देणगीदारांच्या सत्कार समारंभाप्रसंगी महास्वामीजी आशिर्वचन पर बोलत होते. याप्रसंगी बाबुराव मैंदर्गीकर, शिष्यवृत्ती विभाग प्रमुख रेवणसिद्ध वाडकर, सहाय्यक राजशेखर बुरकुले उपस्थित होते.

याप्रसंगी शिष्यवृत्ती योजनेत 50 हजारांची देणगी देणारे स्वकुळ साळी समाजाचे विश्वस्त निवृत्ती गायकवाड, शांताबाई गायकवाड आणि 1 लाख रुपयांची देणगी देणाऱ्या सिद्धेश्वर प्राथमिक शाळेच्या माजी मुख्याध्यापिका प्रमिला नंदगावकर यांचा महास्वामीजींच्या हस्ते शाल, पुष्पहार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यापूर्वीही निवृत्ती गायकवाड यांनी 2 लाख रुपये तर प्रमिला नंदगावकर यांनीही 1 लाख रुपये या शिष्यवृत्ती योजनेसाठी दिले होते. पुन्हा यावर्षी त्यांनी ही नवी रक्कम शिष्यवृत्ती योजनेत दिली आहे. याबद्दल या दोन्ही देणगीदारांचे महास्वामीजींनी आपल्या आशिर्वचनात कौतुक केले.

याप्रसंगी प्रभूराज मैंदर्गीकर, सुयश कविटकर, सचिन लिगाडे, अमोल कोटगोंडे, अंकुर येळीकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविकातून रेवणसिद्ध वाडकर यांनी शिष्यवृत्ती योजनेसंबंधी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजशेखर बुरकुले यांनी केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here