Spam Calls: TRAI चा मोठा निर्णय, फोन करणाऱ्याचे नाव मोबाईल स्क्रीनवर दिसणार

Spam Calls यापुढे फोनवर Unkonwn नंबर नाही तर फोन करणाऱ्याचे थेट नावच मोबाईल स्क्रीनवर दिसणार

0

नवी दिल्ली,दि.17: TRAI ने मोठा निर्णय घेतला आहे. येणाऱ्या अनोळखी फोनमुळे अनेकजण त्रस्त होतात. अनेकदा Spam Calls मुळे अनेकजण वैतागतात. Spam Calls च्या त्रासापासून लवकरच मोबाईल युजर्सची सुटका होणार आहे. Spam Calls रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या (central government) दूरसंचार विभागाने (TRAI) मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे फोनवर Unkonwn नंबर नाही तर फोन करणाऱ्याचे थेट नावच मोबाईल स्क्रीनवर दिसणार आहे. यामुळे Spam Calls करणाऱ्यांना चाप बसणार आहे. सिम कार्ड विकत घेताना ज्या नावाने फॉर्म भरला तेच नाव दिसणार आहे.

तुम्ही कुठलाही फिचर वापरला तरी Unknown आणि Spam Calls पासून वाचणं कठीण आहे. कर्ज, विविध ऑफर्ससाठी मोबाईल ग्राहकांना कॉल्स येत असतात. आता या कचाट्यातून युजर्सला बाहेर काढण्यासाठी TRAI नं नवीन फिचरवर काम करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नको असलेल्या कॉल्सपासून तुमची सुटका होण्याची शक्यता आहे. 

काय आहे नवीन फिचर?

नंबर मोबाईलमध्ये सेव्ह नसला तरी आता कॉल आल्यावर कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव दिसणार आहे. सिम कार्ड विकत घेताना ग्राहकांकडून एक फॉर्म भरुन घेतला जातो. या फॉर्मवर ज्या व्यक्तीचे नाव असणार आहे त्या व्यक्तीचेच नाव मोबाईल स्क्रीनवर दिसणार आहे. हे नाव युजरच्या केवायसीनुसार असेल. म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावावर सिम असेल त्या व्यक्तीचे नाव तुम्हाला दिसेल.

कोणत्याही App शिवाय मोबाईलवर नाव दिसणार

कोणत्याही App शिवाय मोबाईलवर नाव दिसण्याची सुविधा मोबाईल ग्राहकांना मिळणार आहे. या निर्णयामुळे थेट कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव समोर येणार आहे. नंबर ऐवजी कॉलरचे नाव मोबाईलवर दिसणार आहे. दूरसंचार नियामक अर्थात TRAI ने स्पॅम कॉल्सच्या त्रासातून ग्राहकांची सुटका करण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करुन देणार आहे. लवकरच सर्व मोबाइलवर हे फिचर सक्रिय केले जाणार आहे.

दूरसंचार नियामक TRAI लवकरच कॉलर्सची KYC आधारित यंत्रणा सक्रिय करणार आहे. याच्या अंमलबजावणीनंतर मोबाईलमध्ये एकही नंबर सेव्ह नसेल आणि त्या नवीन नंबरवरून कॉल आला, तर त्या नंबरसह कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव मोबाइल स्क्रीनवर दिसणार आहे.

फेक कॉल्स टाळता येणार

थेट नाव मोबाईलवर दिसल्याने मोबाईल युजर्सना फेक कॉल्स टाळता येणार आहत. शकतील. ही यंत्रणा सक्रिय केल्यावर, दूरसंचार विभागाच्या नियमांनुसार दूरसंचार कंपन्यांनी केलेल्या केवायसीनुसार कॉलरचे नाव फोन स्क्रीनवर दिसेल.
म्हणजेच स्क्रीनवर सिमचे नाव दिसेल. यामुळे बंक कॉल करणारे सहज कायदेशीर तावडीत येतील.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here